आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Table Was Manufactured By Microsoft Not Apple

INSIDE STORY: \'अ‍ॅपल\'च्‍याही आधी मायक्रोसॉफ्टने तयार केला होता टॅब्‍लेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'अ‍ॅपल' आज जगातील सर्वाधिक मौल्‍यवान कंपन्‍यांपैकी एक आहे. सर्वाधिक प्रयोगशील कंपनी म्‍हणूनही अ‍ॅपलची ओळख आहे. संगणक, लॅपटॉप, संगीताच्‍या शौकीनांना अतुल्‍य अनुभूती देणारा आयपॉड, स्‍मार्टफोन्‍सची परिभाषा बदलून टाकणारा आयफोन तसेच या तिन्‍ही तंत्रज्ञानाची सांगड घालणारा आयपॅड टॅबलेट.... अशा उत्‍पदनांमधून अ‍ॅपलने जगाला प्रत्‍येकवेळी काहीतरी नविन दिले आहे.

दुसरीकडे आहे मायक्रोसॉफ्ट. हीदेखील जगातील एक आघाडीची आयटी कंपनी आहे. मायक्रोसॉफ्टला आणखी यश मिळाले असते आणि कंपनी 'अ‍ॅपल'च्‍याही पुढे गेली असती. पण, एका चुकीमुळे मायक्रोसॉफ्टची पिछेहाट झाली. मायक्रोसॉफ्टने भविष्‍यात बदलत जाणा-या बाजाराचा योग्‍य प्रकारे अंदाज घेतला नाही. त्‍यामुळे मायक्रोसाफ्टला फटका बसलाच. परंतु, प्रतिस्‍पर्धी कंपनी 'अ‍ॅपल'ला त्‍याचा मोठा फायदा झाला.

जगातील पहिला टॅब्‍लेट कोणी बनविला, असा प्रश्‍न अनेकांना केल्‍यास त्‍यांच्‍या तोंडून 'अ‍ॅपल' हेच उत्तर मिळेल. परंतु, हे उत्तर चुकीचे आहे. जगातला पहिला टॅब्‍लेट 'अ‍ॅपल'ने नव्‍हे तर मायक्रोसॉफ्टने बनविला होता. तोदेखील वर्ष 2000 मध्‍ये. अर्थात 'अ‍ॅपल'चा आयपॅड बाजारात येण्‍याच्‍या 10 वर्ष आधी. तसेच आश्‍चर्यची बाब म्‍हणजे, जो मायक्रोसॉफ्टच्‍या टॅब्‍लेट बनविणा-या टीमचा सदस्‍य होता, त्‍याच्‍या वाढदिवसाच्‍या पार्टीमध्‍ये गेलेल्‍या स्‍टीव्‍ह जॉब्‍सला त्‍याने चांगलेच हैराण केले होते. त्‍याच्‍या बडबडीला कंटाळून जॉब्‍स यांनी यापेक्षा एकदम नाविन्‍यपूर्ण टॅब्‍लेट बनविण्‍याचा निर्णय घेतला.

स्‍टीव्‍ह जॉब्‍सचे आत्‍मचरित्र लिहिणा-या वॉल्‍टर इजॅक्‍सन यांनी या घटनेचे अतिशय सुरेख वर्णन केले आहे. जॉब्‍स यांची पत्नी लॉरीन पॉवेल हिची मायक्रोसॉफ्टचा टॅब्‍लेट बनविणा-या टीममधील या सदस्‍यासोबत मैत्री होती. त्‍याच्‍या 50 व्‍या वाढदिवसानिमित्त त्‍याने जॉब्‍स दांपत्‍याला आमंत्रण दिले होते. इच्‍छा नसतानाही स्‍टीव्‍ह तिथे गेले होते. या पार्टीत त्‍याने शेखी मिरवत स्‍टीव्‍ह जॉब्‍स यांना टॅब्‍लेटबद्दल सर्वकाही सांगितले. तसेच हे उत्‍पादन संगणकाची बाजारपेठ कशी बदलेल, 'अ‍ॅपल'ला या उत्‍पादनासाठी मायक्रोसॉफ्टपासून कशा पद्धतीने परवाना घ्‍यावा लागेल इत्‍यादी मुद्यांवर त्‍याने स्‍टीव्‍ह जॉब्‍स यांना सर्व काही सांगितले. परंतु, ही बडबड ऐकून ते कंटाळले होते.

पार्टीतून घरी आल्‍यावर स्‍टीव्‍ह जॉब्‍स म्‍हणाले, त्‍यांना खरोखरच टॅब्‍लेट कसा असतो, आपण दाखवून देऊ. स्‍टीव्‍ह जॉब्‍स यांनी त्‍या टॅब्‍लेटमधील त्रुटी हेरल्‍या होत्‍या. त्‍यांच्‍या मते, मायक्रोसॉफ्टच्‍या टॅब्‍लेट वापरण्‍यासाठी स्‍टायलसची गरज हीच मोठी त्रुटी होती. त्‍यामुळे त्‍यांनी दुस-याच दिवशी आपल्‍या टीमला एक मल्टि टच आणि कोणत्‍याही प्रकारचा स्‍टायलस किंवा कीबोर्डची गरज न पडणारा टॅब्‍लेट बनविण्‍यास सांगितले. अवघ्‍या 6 महिन्‍यांमध्‍ये 'अ‍ॅपल'चा टॅब्‍लेट तयार झाला होता. परंतु, 'अ‍ॅपल'ने त्‍याचे स्‍वरुप आणखी छोटे करुन आयफोन सादर केला. आयफोन सादर केल्‍यानंतर ब-याच कालावधीनंतर 'अ‍ॅपल'ने आयपॅड लॉंच केला.