NOKIA N1
गॅजेट डेस्क - नोकीयाने कंपनीच्या अधिकृत ट्वीटर आणि
फेसबुक अकाऊंटवर टीजर लॉन्च केल्यानंतर अखेरीस त्यांचा नवा अँड्रॉइड टॅबलेट लॉन्च केल आहे. हा टॅबलेट
मायक्रोसॉफ्टने त्यांच्या पहिला ब्रँड फोन लॉन्च केल्यानंतर काही दिवसातच लॉन्च केला आहे. नोकीया N1 नावाने लॉन्च झालेल्या हा टॅबलेट नोकीयाच्या या वर्षातील सर्वात मोठ्या लॉन्चपैकी एक आहे.
काय आहे वेगळेपण -
*
नोकिया N1 मिनीमधील सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे हा टॅबलेट अॅपलच्या आयपॅड मिनिप्रमाणे दिसतो.
* या टॅबलेटमध्ये अँड्रॉइड लॉलीपॉप 5.0 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले आहे.
* नोकिया Z लॉन्चर अॅपच्या साह्याने स्क्रीनवर केवळ एक अक्षर लिहिताच युजरला क्या सर्च करायचे आहे याचे अनेक ऑप्शन मिळतात. यामुळे युजरने सर्वात जास्त वापरलेल्या अॅपच्या आधारे हे काम करेल
केव्हा होईल उपलब्ध-
नोकीयाचा N1 टॅबलेट सर्वात पहिले चीनमध्ये मिळणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या टॅबलेटची विक्री 2015 पासून सुरू होणार आहे. चीननंतर युरोप आणि इतर देशांमध्ये हा टॅबलेट उपलब्ध करून देण्यात येईल.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, नोकीयाच्या या टॅबलेटचे फीचर्स -