आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी विचार करा, मगच जामीनदार बना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


केवळ कागदपत्रांच्या आधारे बँकांनी कर्ज द्यावे, असे बंधन नाही. बँक जामीनदारही मागू शकते. कर्जाऊ रकमेचा रक्षक अशी जामीनदाराची भूमिका असते. कर्जाच्या परतफेडीची हमी ते देत असतात. कर्जदार कर्जाची परतफेड करू शकला नाही तर ती रक्कम फेडण्यासाठी जामीनदार सहमत असतो. शैक्षणिक कर्ज प्रकरणात माता-पिता जामीनदार असतात. अपत्याकडून कर्जफेड झाली नाही तर त्यासाठी माता-पिता जबाबदार असतात.
कोण बनू शकते जामीनदार : सर्वसाधारणपणे कोणीही जामीनदार बनू शकते. बँकेने मानले तर नातेवाईकही जामीन राहू शकतो. मात्र, कोणासाठीही जामीनदार बनने व्यावहारिक नाही. त्यासाठी बँकेच्या अटींची पूर्तता करावी लागते.कर्जदारांसाठी असणा-या अटींप्रमाणेच या अटी असतात. बँका जामीनदाराची क्रेडिट हिस्ट्री तपासतात. त्याद्वारे बँका जामीनदाराची कर्जफेडीची क्षमता लक्षात घेतात. जामीनदार आपल्या जामिनासह कर्जाशी संबंधित असतो. जामीनदार बनण्यापूर्वी गॅरंटी डीड (जामीनपत्र) वर स्वाक्षरी करावी लागते.

असे असते जामीनपत्र
*निर्धारित वेळेत कर्जदार परतफेड करू शकला नाही तर जामीनदाराला रक्कम भरावी लागेल.
*कर्जदार आपले उत्पन्न व वयासंबंधीच्या सर्व बाबींचे पालन करत आहे.
*कर्जदार थकबाकीदार झाल्यास ती सर्व रक्कम फेडण्यासाठी जामीनदार जबाबदार आहे.
जामीनदाराची आवश्यकता कशासाठी :
बँकिंगचे तंत्र गुंतागुंतीचे आहे. मालमत्तेच्या विक्रीतून कर्जवसुलीचे नियम फारसे कडक नाहीत. काही वेळा मालमत्तेची विक्री करून कर्जवसुलीत खूप अडचणी येतात. त्यामुळे स्वहिताच्या संरक्षणार्थ तसेच कर्जवसुली वेळेत व्हावी हे निश्चित करण्यासाठी बँका जामीनदार ठेवण्याबाबत आग्रही असतात.
गृह कर्ज प्रकरणात या परिस्थितीत असते जामीनदाराची गरज :
*कर्ज घेणारी व्यक्ती एकच असेल, सह अर्जदार कोणीच नसेल तर
*कर्जदाराला जिथली जमीन खरेदी करायची असेल तेथे वास्तव्य करत नसेल तर
*अर्जदार स्वयंरोजगारी असेल आणि त्याच्याकडे व्यावसायिक योग्यता नसेल तर
*अर्जदाराची नोकरी बदलीची असेल
*दीर्घ काळासाठी विदेशी राहावे लागणारे काम करत असेल तर
कर्ज थकवण्याचे, बुडिताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जामीनदार राहण्यापूर्वी त्याच्या परिणामाबाबत माहिती असणे आवश्यक आहे. आपण कोणासाठी जामीन राहतो आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्यासाठीच जामीन राहा. ज्यांची जामीन घेतला आहे, त्याने कर्ज थकवल्यास कर्जफेड जामीनदाराला करावी लागते, हे पक्के लक्षात ठेवा.

लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.
adhil.shetty@dainikbhaskargroup.com