आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात 2006 नंतर प्रथमच वर्षाच्या पहिल्या सत्रात घसरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नववर्षाच्या पहिल्याच सत्रात सेन्सेक्सने धडाक्यात प्रारंभ केला. मात्र, दुपारच्या सत्रातील विक्रीमुळे निर्देशांकात घसरण झाली. विदेशी कलाची अनुपस्थिती आणि खरेदी-विक्रीचा जोर यामुळे बाजारात 2006 नंतर प्रथमच वर्षाच्या पहिल्या सत्रात घसरण दिसून आली. जगातील प्रमुख शेअर बाजार नववर्षाच्या सुटीमुळे बंद होते. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि इन्फोसिस या दिग्गज समभागांतील विक्रीने सेन्सेक्समध्ये घसरण झाली.
दिवसअखेर सेन्सेक्स 30.20 अंकांनी घसरून 21,140.48 वर स्थिरावला. निफ्टीत 2.35 अंकांच्या किरकोळ घसरणीसह 6301.65 वर आला. दिग्गज समभाग विक्रीच्या रणात धारातीर्थी पडत असताना स्मॉल आणि मिड कॅप समभागांनी मात्र जोरदार कामगिरी बजावली. त्यामुळे सेन्सेक्सची घसरण सावरण्यास मदत झाली. वित्तीय तूट 93.9 टक्क्यांवर पोहोचल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला.
टॉप लुझर्स : विप्रो, टाटा पॉवर, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, भेल.
टॉप गेनर्स : भारती एअरटेल, एनटीपीसी, सन फार्मा, कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प
रुपया आपटला
वर्षअखेरच्या सत्रातील सर्व तेजीवर पाणी फेरत रुपयाचे मूल्य नववर्षाच्या पहिल्या सत्रात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 10 पैसे गमावत 61.90 ही पातळी गाठली.
दिल्लीत सोने-चांदी तेजीने चमकले
सरते वर्ष मौल्यवान धातूंसाठी फारसे दिलासादायी ठरले नसले तरी 2014 ची सुरुवात या धातूंसाठी सकारात्मक ठरली. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 225 रुपयांनी वाढून 30,025 झाले. चांदी किलोमागे 45 रुपयांनी वाढून 43,800 झाली. सराफा व्यापा-यांनी सांगितले, सोने आणि चांदीच्या घसरलेल्या किमतीमुळे मागणीत वाढ झाली. परिणामी सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या. मागील दोन सत्रांत सोने तोळ्यामागे 320 रुपयांनी तर चांदी किलोमागे 1245 रुपयांनी स्वस्त झाली होती.
स्मॉल-मिड कॅपने तारले
किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सर्व काही संपलेले नसून स्मॉल आणि मिड कॅप समभागांसाठी 2014 हे वर्ष आशादायी ठरणार आहे.किशोर ओस्तवाल, सीएमडी, सीएनआय