अशी होती WWWची / अशी होती WWWची पहिली वेबसाइट, जाणून घ्या रंजक बाबी

Mar 14,2014 12:57:00 PM IST

वर्ल्ड वाइड वेबला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे इंटरनेट यूजर्स खूश आहेत. वेबचे मुख्य काम विद्यापिठातील शास्त्रज्ञ आणि जगातील विविध संस्था यांच्यामध्ये ऑटोमॅटिक पद्धतीने माहिती शेअर करणे हे होते. जिनोव्हामधील सर्न प्रयोगशाळेत टिम बर्नस ली या ब्रिटिश शास्त्रज्ञाने पहिली वेबसाइट तयार केली होती. या वेबसाइटता यूआरएल info.cern.ch/hypertext/WWW/TheProject.html होता.

अत्यंत साध्या पद्धतीचे हे वेब पेज पहिल्या दिवशी ज्याप्रमाणे होते त्याचप्रकारे आजही आहे. या वेबसाइटचा वापर 30 एप्रिल 1993 पर्यंत सर्न प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी केला. यानंतर वर्ल्ड वाइड वेब डोमेन आले आणि अनेक लोकांनी वेबसाइट तयार करण्यास सुरवात केली आणि वेबच्या जगात याच काळात क्रांती झाली.इंटरनेटचे महत्त्व आपल्यापैकी प्रत्येकजण जाणतो. इंटरनेट ज्या प्लॅटफॉर्मवर काम करते ते कधी आले हे मात्र खूप कमी लोकांना माहिती असते. 25 वर्षांपूर्वी 1989मध्ये टिम बर्नर्स ली ( Tim Berners-Lee)यांना सर्वात अधी वर्ल्ड वाइड वेब तयार करण्याची कल्पना सुचली होती. त्यावेळी वर्ल्ड वाइड वेब एवढे लोकप्रिय होईल याचा टिमला अंदाज नव्हता.

मार्च 1989मध्ये टिमने एक रिसर्ज पेपर पब्लिश केला. या पेपरमध्ये टिमने CERNच्या मॅनेजरला एक अशी इंफॉर्मेशन सिस्टम तयार करण्याची मागणी केली जी लॅबमधील कॉम्प्यूटर्सना ऐकमेकांशी जोडू शकते. टिमची ही मागणी मान्य करण्यात आली आणि त्यानंतर विदयापिठ आणि शास्त्रज्ञांना कनेक्ट करणारी एक सिस्टम तयार करण्यात आली. इंटरनेटचे हे पहिले कम्यूनिकेशन होते.


एप्रिल 1993मध्ये CERN कंपनीने इंटरनेटची रॉयल्टी ओपन सोर्स केली. त्यानंतर सुरू झाले इंटरनेटचे युग. 90च्या दशकाला डॉट- कॉमचा काळ म्हटले जाते. याच काळात अनेक वेब कंपन्या उदयास आल्या. यात गुगल आणि अ‍ॅमेझानसारख्या प्रसिद्ध साइटचाही समावेश आहे
X