आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाचा अर्ज नामंजूर होण्याची पाच कारणे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


काही कारणांमुळे बँका कर्जास नकार देऊ शकतात हे बहुतेकांना माहीत आहे. विशेषत: होम लोनच्या बाबतीत हे अधिक जाणवते. जर तुम्ही नवे कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर काही बाबी लक्षात घेणे व तशी तयारी करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला यासाठी क्रेडिट स्कोअर वाढवण्याची गरज भासेल. क्रेडिट कार्डाद्वारे परतफेड असेल तर त्याची तयारी करावी लागते. उत्पन्न वाढवण्याची गरज पडू शकते तसेच जुने कर्ज बंद करावे लागू शकते. मात्र, कर्जाचा अर्ज नामंजूर होण्यामागे केवळ ही कारणे आहेत असे नव्हे. काही अशी कारणे असतात, त्यासाठी प्रत्यक्षरीत्या तुमची जबाबदारी नसते. अशी काही कारणे आणि त्यावरील उपाय...

1.तुम्ही नोकरीत एका ठिकाणी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकत नाहीत : सध्याच्या पिढीत सतत नोक-या बदलणे रूढ झाले आहे. मात्र, बँकेच्या नियमानुसार हे अस्थिरतेचे लक्षण आहे. कर्जाचा अर्ज फेटाळण्यासाठी हे कारण पुरेसे आहे. अर्जदार एका कंपनीत किंवा संस्थेत किमान तीन वर्षे तरी कार्यरत असण्याला बँका प्राधान्य देतात.
सल्ला : जर तुम्ही कर्ज घेऊ इच्छिता किंवा दुस-या बँकेत लोन शिफ्ट करण्याची इच्छा असेल तर एका टिकाणी किमान वर्षभर टिकून काम करा.

2. आपल्या घराचा पत्ता डिफॉल्टर यादीत आहे : एखाद्याने कर्जफेड किंवा क्रेडिट कार्डची परतफेड न केलेल्याच्या घरात तुम्ही राहत आहात काय? सिबिलकडे तशी माहिती असेल तर तुमचा कर्जाचा अर्ज नामंजूर होण्याची शक्यता आहे.
सल्ला : या मुद्द्यावर बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरशी चर्चा करा. भाडेकरू डिफॉल्टर असेल तर तसे त्या मॅनेजरला सांगा. थकबाकीदार कुटुंबातील सदस्य असेल तर तो तुमच्यावर विसंबून नसल्याचे त्यांना सांगा.

3. तुमचे प्रोफाइल बँकेच्या नियमांशी सुसंगती साधत नसेल : बँकांच्या नियमानुसार काही विशेष प्रोफाइल किंवा क्षेत्र, विभाग नकारात्मक सूचीत असतात. त्याच्याशी संबंधित असलेल्यांना कर्ज मिळत नाही.
सल्ला : जर तुमचे प्रोफाइल बँकेशी सुसंगत नसेल तर बँकेशी चर्चा करा. तसेच अतिरिक्त सुरक्षा देऊन (गरज भासल्यास जामीनदाराच्या रूपात किंवा विमा पॉलिसी, एफडी, मालमत्तेची कागदपत्रे किंवा कर्ज फेडण्याची क्षमता असल्याचे पुरावे सादर करून ) कर्जासाठी विनंती करू शकता.

4. जुन्या मालमत्तेच्या खरेदीसाठी कर्ज हवे असेल तर : जर तुम्ही 20 वर्षांपेक्षा जुनी मालमत्ता खरेदी करत असाल तर बँका कर्ज देणार नाहीत. यासाठी बँकनिहाय वेगवेगळे नियम आहेत.
सल्ला : जमीन अशी मालमत्ता आहे, त्याबाबत बँका नेहमी विचार करतात. डाऊन पेमेंटची रक्कम वाढवून तसेच जास्तीची सुरक्षा देऊन कमी रकमेच्या कर्जाबाबत चर्चा करता येईल.

5. याआधी कर्जाचा अर्ज नामंजूर झाला असेल : कर्जाच्या फेटाळलेल्या अर्जाचे बँका रेकॉर्ड ठेवतात. कर्जासाठी बँकेत अर्ज केल्यास तुमची पतकुंडलीतील (क्रेडिट प्रोफाइल) माहिती समोर येते. जर एखाद्या ठिकाणी कर्जाचा अर्ज नामंजूर झाला असेल तर तो अडसर ठरू शकतो.

सल्ला: विनाकारण कर्जासाठी अर्ज देणे उचित नाही. तुमचा अर्ज कोठे, केव्हा व का नामंजूर झाला याचा मेळ लागणार नाही.त्यामुळे कर्जासाठी वेगवेगळ्या बँकांत अर्ज करण्यापूर्वी त्याचे गुण-दोष विचारात घ्या. थकबाकीशिवाय आपला अर्ज ज्या कारणामुळे नामंजूर झाला त्याबाबतची वास्तविकता बँकेच्या लक्षात आणून द्या.

लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.
adhil.shetty@dainikbhaskargroup.com