आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीओसाठी पाच कंपन्यांचे धाडस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भांडवल बाजारातील खराब वातावरणामुळे एप्रिल ते मे मध्ये किमान दोन कंपन्यांना आयपीओतून माघार घ्यावी लागली आहे, परंतु तरीही सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड यासह पाच कंपन्यांनी याच कालावधीत बाजारात आयपीओ आणण्याचे धाडस दाखवले आहे. विशेष म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला माघार घेतलेल्या गुडविल हॉस्पिटलचा देखील यात समावेश आहे.
राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (आरआयएनएल), गुडविल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर, फास्ट ट्रेन कार्गो, एस टूर्स वर्ल्डवाइड आणि सी. महेंद्र इन्फोज्वेल्स या कंपन्यांनी भांडवल बाजार नियंत्रक सेबीकडे प्राथमिक समभाग विक्रीसाठी अर्ज दाखल केले आहे.
या पाच कंपन्यांमध्ये 'सेबी'ने सी. महेंद्र इन्फोज्वेल्स आणि गुडविल हॉस्पिटल या कंपन्यांच्या र्मचंट बॅँकर्सकडून स्पष्टीकरण किंवा अतिरिक्त माहिती मागवली असून त्यासाठी 25 मे पर्यंतची मुदत देण्यात आली असल्याचे बाजार नियंत्रकांकडे उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे. पॅकेजिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्लॅस्टेन इंडिया आणि वाहनांच्या सुट्या भागांच्या निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या संवर्धन मदरसन फायनान्स या कंपन्यांनी किरकोळ गुंतवणूकदारांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर भांडवल बाजारातून काढता पाय घेतला होता.
सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड ही कंपनी प्राथमिक समभाग विक्रीच्या माध्यमातून 10 टक्के भागभांडवलाची विक्री करण्याचा विचार करीत आहे. याशिवाय लॉजिस्टिक सेवा पुरवठादार फास्ट ट्रेन कार्गो 48.99 टक्के भांडवल विक्रीच्या माध्यमातून निधी उभारणार असून त्यासाठी कंपनी 52.83 लाख समभाग विक्रीला आणत आहे. निधी क्षमता विस्तार वापरणार आहेत.