पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्या बजेटनंतर शेअर बाजारात तेजी संचारली आहे. छोट्या गुंतवणुकदारांना 'अच्चे दिन' येण्याची शक्यता आहे. मन्नापुरम फायनान्स, यूबी होल्डिंग, फर्स्टसोर्स, अशोक लीलॅंड आणि इंडियाबुल्स पॉवर या कंपन्यांनी 50 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचे पाच शेअर उपलब्ध करून दिले आहेत. ते गुंतवणुकदारांना अल्पावधीत जास्त लाभ मिळवून देऊ शकतात.
बाजाराच्या विशेषज्ज्ञांच्या मते, बहुतांश कंपन्यांचे पहिल्या तिमाहीत चांगली घौडदोड पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी बाजारात या कंपन्यांच्या शेअर्सना चांगली किंमत मिळू शकते.
मोतीलाल ओसवाल सेक्युरिटीतर्फे जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, ऑटोमोबाइल क्षेत्रातील अशोक लीलॅंडचे व्हॅल्युएशन सद्यस्थितीत उत्तम दिसत आहे. त्यामुळे पहिल्या तिमाहीत कंपनीची स्थिती मजबूत दिसण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी अशोक लीलॅंड एक चांगला पर्याय आहे.
का खरेदी करावे?
=> मॅनेजमेंटनुसार कंपन्यांचा वाईट काळ संपुष्टात आला आहे.
=> आर्थिक वर्ष 2015 मध्ये कंपन्यांची 8-10 टक्के प्रगतीची शक्यता आहे.
=> कंपन्यांनी कर्ज फेडण्यावर अधिक भर आहे. कंपनीच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे.
टेक्निकल अॅनालिस्ट धवल पी व्यास यांच्या मते, पॉवर सेक्टरमधील कंपनी इंडियाबुल्स पॉवरचा विकासाचा आलेख आतापर्यंत चढता दिसत आला आहे. चार्ट्सवरही इंडियाबुल्स पॉवरला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जास्त प्रॉफिट देणार्या कंपन्यांबाबत माहिती जाणून घ्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(फाईल फोटो: शेअर बाजार)