आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Flipkart कडून Myntra ची सुमारे 1800 कोटींना खरेदी? आणखी 600 कोटी गुंतवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील सर्वांत मोठी ऑनलाईन रिटेलर कंपनी Flipkart ने फॅशन पोर्टल Myntra ला तब्बल 1800 कोटी रुपयांना विकत घेतल्याची माहिती ऑनलाईन व्यवसायातील सूत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली आहे. Myntra मध्ये आणखी 600 कोटी रुपये गुंतवण्याचे संकेत Flipkart ने दिले आहेत. भारताच्या ई-कॉममधील ही सर्वांत मोठी डील असल्याचे सांगितले जात असून यावरून भारतीय ई-कॉमची व्यापकता लक्षात येते.
यासंदर्भात बंगळून येथील Flipkart चे सहसंस्थापक सचिन बन्सल म्हणाले, की आम्ही Myntra चे 100 टक्के टेकओव्हर केले आहे. या सेगमेंटमध्ये आमचे आणखी मोठे प्लॅन्स आहेत.
या डीलची नेमकी आर्थिक माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, ऑनलाईन व्यवसायातील सूत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ही डील सुमारे 1,800 कोटी म्हणजेच 300 मिलियन डॉलरला झाली आहे.
भारतीय ऑनलाईन फॅशन व्यवसायात गेल्या काही दिवसांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या डीलमुळे Flipkart ची फॅशन व्यवसायातील पकड मजबूत होणार आहे. Amazon या ऑनलाईन व्यवसायातील कंपनीच्या दोन माजी कर्मचाऱ्यांनी 2007 मध्ये Flipkart ची स्थापना केली होती.
Myntra चे सहसंस्थापक मुकेश बन्सल Flipkart च्या व्यवस्थापकीय मंडळावर येणार आहेत. Flipkart ची फॅशन कॅटेगरी मुकेश सांभाळतील, असे सचिन यांनी सांगितले आहे.

आयआयटीचे माजी विद्यार्थी मुकेश बन्सल, आशुतोष लवानीया, इमरान खान आणि विनित सक्सेना यांनी Myntra ची स्थापना केला होती. याचे मुख्यालय बंगळूरलाच आहे.