नवी दिल्ली/ बंगळुरू - फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या ई-रिटेल मार्केटमधील दोन कंपन्यांनी सोमवारी देशात सर्वात मोठ्या विक्रीचा विक्रम केला. दोन्ही कंपन्यांच्या वेबसाइटवरून सोमवारी १० तासांत ६००-६०० कोटींपेक्षाही जास्त रुपयांच्या वस्तू विकल्या गेल्या. दोन्ही कंपन्यांनी विशेष ऑफर दिल्या होत्या. ऑफर सुरू होताच काही तासांत फ्लिपकार्टची वेबसाइट क्रॅश झाली.
फ्लिपकार्ट v/s स्नॅपडील
फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी २००७ मध्ये ६१० क्रमांकाच्या खोलीतून व्यवसायाला प्रारंभ केला म्हणून सोमवारी बिग बिलियन डे साजरा केला. उलट, स्नॅपडीलने इतरांसाठी हा विशेष दिवस असला तरी आमच्यासाठी नेहमीच्या दिवसांप्रमाणेच असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती.
विक्रीचे मोठे दावे
दर सेकंदाला १० उत्पादने विकल्याचा दावा स्नॅपडीलने केला आहे.
90% पर्यंतची सूटफ्लिपकार्टने
नोकियाचा १०२०
मोबाइल ६० टक्के कमी किमतीने विकला. काही उत्पादनांवर ९० टक्यांची सूट दिली.
विश्वविक्रम चीनच्या अलिबाबाच्या नावे अलिबाबा या ई-कॉमर्स कंपनीने नोव्हेंबर २०१३ मध्ये सुमारे ३५०० कोटींचे उत्पादन विकले होते. त्या दिवशी चीनमध्ये सिंगल्स डे होता.
इकडे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत यंदा २३ लाख कोटींची वाढ
मुंबई | शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संपत्ती यंदा २३.३३ लाख कोटींनी वाढली आहे. यात सेन्सेक्समधील २५.४९ टक्यांच्या वाढीचे मुख्य योगदान आहे. मागच्या वर्षी ही संपत्ती १.१० लाख कोटी होती.
१०० लाख कोटी क्लब
सध्या बीएसईच्या सूचिबद्ध कंपन्यांचा एकूण बाजार ९३, ७७,६७२ कोटींचा आहे. लवकरच हा १०० लाख कोटींवर जाईल.