आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बिलियन सेल मध्ये निराशा झालेल्या यूजर्सची फ्लिपकार्टने मागितली माफी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लिपकार्टने सहा तारखेच्या बिग बिलियन सेलमध्ये यूझर्ना झालेला त्रास आणि निराशेबाबत माफी मागितली आहे. कंपनीचे फाऊंडर्स सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी मंगळवारी ई मेलद्वारे सर्व ग्राहकांची माफी मागितली आहे. फ्लिपकार्टने सोमवारी विविध ऑफरमध्ये मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट जाहीर केले होते. त्याची भरपूर जाहिरातही करण्यात आली होती. पण प्रत्यक्ष सेलच्या दिवशी साईट हँग झाल्याने अनेक ग्राहकांची निराशा झाली होती.

काय लिहिले आहे पत्रात?
कंपनीने पत्रात म्हटले आहे की, 6 ऑक्टोबरचा दिवस आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. पण यादिवशी आमच्या ग्राहकांना अनेक असुविधा झाल्या. यादिवसासाठी आमच्यातील प्रत्येकजण अनेक दिवसांपासून तयारी करत होता. पण ग्राहकांना पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला नाही याचे आम्हाला दुःख आहे.

फ्लिपकार्टवर अपेक्षेपेक्षा जास्त ग्राहकांनी भेट दिली. या सेलसाठी 5000 सर्व्हर वापरण्यात आले होते. या दिवशी सुमारे 15 लाख ग्राहकांनी शॉपींग केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी भेट दिल्याने साईट काही काळासाठी हँगही झाली होती. त्यामुळे अनेकांना शॉपींग करता आली नाही. अशा ग्राहकांची आम्ही माफी मागत आहोत. तसेच भविष्यात परत अशी चूक होऊ नये म्हणून पूर्ण तयारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फ्लिपकार्टच्या या सेलविरोधात अनेकांनी तक्रार केली आहे. यासंदर्भात वाणिज्यमंत्री निर्मला सीतारमण यांनी कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत.
पुढे वाचा, काय म्हणाल्या सीतारमण?