आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FlipKart Gets Exposed In Blank Boxes Delivery To Customer

VIDEO: पेन ड्राइव्ह ऐवजी FLIPKART ने पाठविला रिकामा बॉक्स, दिले पैशांचे आमिष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ग्राहकाला पाठवलेल्या पेन ड्राइव्हचा बॉक्स रिकामा निघाला आहे. ग्राहकाचा आरोप आहे, की असे एकदा नाही तर याआधी तीन वेळा झाले आहे. याचा मनस्ताप झाल्याने ग्राहकाने तिसर्‍यावेळेस डिलिव्हरी बॉयलाच बॉक्स उघडण्यास सांगितले आणि त्याचा व्हिडिओ तयार केला. व्हिडिओमध्ये पाहाता येते की, डिलिव्हरी बॉय स्वतः बॉक्स उघडत आहे.

फ्लिपकार्टकडून या ग्राहकाला पाठवण्यात आलेला बॉक्स रिकामा होता. ग्राहकाने हा व्हिडिओ भास्कर डॉट कॉमला शेअर केला आहे. यावर फ्लिपकार्टकडून या प्रकरणाचा तपास करत आहोत, लवकरच उत्तर देऊ असे सांगण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण
म्हैसूर येथील आदर्श आनंदन याने फ्लिपकार्टकडून 550 रुपये किंमतीचा एक पेन ड्राइव्ह ऑर्डर केला होता. पहिल्या वेळेस जेव्हा त्याला डिलिव्हर झालेला बॉक्स रिकामा निघाला तेव्हा त्याने त्याची तक्रार फ्लिपकार्टकडे केली होती. आनंदन याला फ्लिपकार्टने 55 रुपये नुकसानभरपाई दिली होती.

आदर्शचे म्हणणे आहे, की त्याने पुन्हा एकदा पेन ड्राइव्ह ऑर्डर केला. यावेळी देखील बॉक्स रिकामा होता. यावेळी त्याने तक्रार केल्यानंतर कंपनीने त्याच्यावरच आरोप केला. तुम्ही वस्तू मिळाल्यानंतरही ती मिळाली नसल्याचा बनाव रचत असल्याचे म्हटले. यानंतर आदर्शने त्याचा व्हिडिओ तयार करण्याचे ठरवले आणि तिसर्‍या वेळेस ऑर्डर केली.
कंपनीने दिली 3000 हजार रुपयांची ऑफर
आदर्श म्हणाला, 'व्हिडिओ पाहिल्यानंतर कंपनीने त्याला 3000 हजार रुपयांची ऑफर दिली, मात्र त्याने ती नाकारली.' त्याचे म्हणणे आहे, की मी हे नुकसानभरपाईसाठी केले नसून इ-रिटेलर्सने त्यांची चूक मान्य करावी आणि ग्राहकांना कमी लेखू नये.
पुढील स्लाइडवर पाहा, आणखी छायाचित्र