ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने गुरुवारी भारतात आपला पहिला टॅबलेट डिजिफ्लिप प्रो XT712 (फोटोत) लॉन्च केला. या टॅबलेटची किंमत 9999 रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या टॅबलेटच्या सोबत 5000 रुपयांपेक्षा जास्तीचे शॉपिंग बेनेफिट्स आणि 2000 रूपयांची इ-बुक्स मिळणार आहेत. यासोबत एक ब्लुटूथ मिळणार आहेत आणि तसेच कव्हरवरदेखील 50 टक्क्यांची सुट मिळणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की हा टॅबलेट खरेदी केल्यानंतर ग्राहकांना जवळपास 9000 रूपयांचा फायदा होईल.
हे डिव्हाईस फ्लिपकार्टच्या वेबसाईटवरून खरेदी करता येणार आहे. कंपनीने या डिव्हाईससाठी देशातल्या 100 शहरांत 120 सेंटर्सची स्थापना केली आहे. दिल्ली, मुंबई, बेंगलुरू, हैदराबाद आणि चेन्नईसह 13 शहरांतील ग्राहक 22 सेंटर्सवर फ्लिपकार्टच्या 24 तास सेवेचा फायदा घेऊ शकतील.
काय आहेत वैशिष्ट्ये
याची मेटल बॉडी असून याची जाडी केवळ 9.2 मिलीमीटर आहे. हा आपल्या क्लासमधल्या टॅबलेट्सच्या तुलनेत 10 टक्के बारीक आहे. याचं वजन 285 ग्राम आहे. टॅबलेटचा स्क्रीन साइझ 7 इंच आहे. यात 1280x800 पिक्सेल्सची हाय डेफिनेशन आईपीएस स्क्रीन आहे. हे डुअल सिम 3जी डिव्हाइस आहे, ज्यात वॉइस कॉलिंग फीचरदेखील आहे. 1जीबी रॅम, 16 जीबीची इंटर्नल हार्डडिस्क (32 जीबी एक्सपांडेबल), 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि 3 हजार एमएएचची बॅटरी आहे. इतर सुविधांमध्ये गूगल प्ले स्टोर, वाय- फाय आणि ब्लूटूथ 4.0 सपोर्टदेखील समाविष्ट आहे. याशिवाय यात मीडिया टेक एआरएम कोरटेक्स ए 7 क्वाड कोर चिपसेट आहे. क्लॉक स्पीड 1.3 गीगा हर्टझ् आहे. याला एक वर्षाची वॉरंटी मिळेल.
अॅमेझॉनशी टक्कर?
अॅमेझॉन सध्या सगळ्यात मोठा रिटेलर आहे, ज्याने स्वतःचा टॅबलेट बाजारात आणून हार्डवेअरमध्ये बाजारपेठ निर्माण केली आहे. अॅमेझॉनच्या टॅबलेटची रचना अॅंड्रॉइडच्या मिळत्या जुळत्या व्हर्जनवर चालतो. तसंच यात
गुगल स्टोअरची सुविधा उपलब्ध नाहीये. तसेच फ्लिपकार्टने लॉन्च केलेला टॅबलेट अॅंड्रॉइडवर आधारलेला आहे, जे 4.2.2 चं संशोधित व्हर्जन आहे, ज्यात प्ले स्टोअरची देखील सुविधा आहे. जाणकारांच्या मते फ्लिपकार्टचा हा टॅबलेट अॅमेझॉनच्या टॅबलेटला जास्त धोका निर्माण करणार नाही, परंतू किंमतीच्या बाबतीत हा ग्राहकांसाठी मोठा पर्याय ठरणार आहे. तसेच यामुळे फ्लिपकार्ट आणि मिंट्रासारख्या वेबसाईट्सच्या उलाढालीत मदत करेल. फ्लिपकार्टने नुकतेच मिंट्राला टेकओव्हर केले.
पुढच्या स्लाइड्सवर वाचा- फ्लिपकार्टच्या टॅबलेटची इतर कंपन्यांच्या टॅबलेट्सशी तूलना