देशातील नंबर एकची शॉपिंग वेबसाईट 'फ्लिपकार्ट'च्या 'बिग बिलियन डे'ची सुरुवात धमाकेदार झाली आहे. 'फ्लिपकार्ट' जवळपास सर्वच वस्तूंवर जबरदस्त सूट देत आहे. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार 'फ्लिपकार्ट'ला ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. ही ऑफर केवळ एक (6 ऑक्टोबर) दिवसासाठीच आहे. या मेगासेल ऑफरमुळे वेबसाईट हँग होत असून फार उशिराने ओपन होत आहे.
फ्लिपकार्टचे अँड्रॉइड अॅपदेखील आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही फ्लिपकार्टवरील विविध ऑफर्स आणि इतर गोष्टी सहजपणे तुमच्या
स्मार्टफोनवर जाणून घेऊ शकता. या अॅपमुळे युझर्सला आणखी सोप्या पद्धतीने खरेदी करता येऊ शकते.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या ऑफर्सची अधिक माहिती...