मुंबई - अपु-या मान्सूनचा मोठा फटका अन्नधान्य उत्पादनाला बसणार आहे. देशातील अन्नधान्याचे उत्पादन सात टक्क्यांनी घटून ते १२० दशलक्ष टनांवर येण्याचा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्षात १२९.२४ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन झाले होते. यंदा मान्सूनला उशीरा प्रारंभ झाला. नंतरच्या काळातही एकूण सरासरीपेक्षा जवळपास १२ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे देशपातळीवर पेरणीत तीन टक्कयांची घट झाली. त्याचा मोठा फटका कृषी उत्पन्नाला बसणार आहे. त्यामुळे यंदा १२० दशलक्ष टन कृषी उत्पादन होण्याचा अंदाज केंद्र सरकारच्या अधिकृत निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
देशात खरीप हंगाम हा शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यंदा जूनमध्ये मान्सूनचा तुटवडा ४३ टक्के होता. त्यानंतर देशात चांगला मान्सून झाला. ऑगस्ट अखेर पावसाची तूट १२ टक्क्यांपर्यंत कमी झाली. त्यामुळे शेतीच्या कामाला वेग आला.