आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई ‘किरकोळ’ घटली!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजीपाला, खाद्यतेल आणि प्रोटीनयुक्त उत्पादनांच्या किमती घटल्यामुळे किरकोळ (रिटेल) महागाई दर एप्रिलमध्ये 1 टक्क्याने घटून 9.39 टक्क्यांवर आला आहे. ग्राहक मूल्य निर्देशांकावर (सीपीआय) आधारित महागाई दर मार्चमध्ये 10.39 टक्के होता. भाजीपाला श्रेणीच्या किमती एप्रिलमध्ये घटून 5.43 टक्के झाल्या. अंडी-मांस आणि माश्यांसारखे प्रोटीनयुक्त खाद्याच महागाई दर 13.60 टक्के राहिला. खाद्य अणि पेय श्रेणीचा महागाई दर 10.61 टक्के होता.

मार्च ते एप्रिलदरम्यानच्या कालावधीत धान्य, तेलबिया, अंडी-मांस आदींच्या किमतीत मात्र वाढ नोंदवण्यात आली. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीत याबाबत माहिती देण्यात आली. एप्रिलमध्ये शहरी भागांत किरकोळ महागाई दर 9.73 टक्के होता. ग्रामीण भागात मात्र तो 9.16 टक्के नोंदवण्यात आला.

घाऊक मूल्य आधारित महागाई दर (डब्ल्यूपीआय) मंगळवारी जाहीर होण्याची आशा आहे. समग्र महागाई दराची मार्चमधील आकडेवारी सुधारून 5.96 टक्के करण्यात आली आहे.