आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्र सरकारची १७ फूड पार्कला मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र सरकार पुढील काही महिन्यांमध्ये देशभरात १७ फूडपार्कला मंजुरी देणार असून त्यामुळे २,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होण्यास मदत होऊ शकेल, असे अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दिली.
नवीन सरकार केंद्रात आल्यापासून आतापर्यंत २० नवीन शीतसाखळी प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पायाभूत आणि क्लस्टर विकास क्षेत्रातही नवीन योजना चाचपून बघण्यात येत असल्याचे बादल यांनी सांगितले. मेगा फूड पार्कच्या २००८-०९ च्या योजनेंतर्गत सरकारने देशभरात ४२ प्रकल्पांना मंजुरी दिली असून त्यापैकी २५ प्रकल्प हे अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. उर्वरित १७ प्रकल्पांसाठी ७२ पात्र स्वारस्य पत्रे आली असल्याचे बादल यांनी स्पष्ट केले. पुढील काही महिन्यांमध्ये सरकार आणखी १७ नवीन प्रकल्पांना मंजुरी देत आहे. या प्रत्येक प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास १२५ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होण्याचा अंदाज आहे. अन्न प्रक्रिया सचिव सिराज हुसेन म्हणाले की, मंजुरी देण्यात आलेल्या २५ प्रकल्पांमध्ये दोन अगोदरच कार्यान्वित झाले असून त्यातील एक हरिद्वार आणि दुसरा चित्तूर येथे असल्याची माहिती त्यांनी िदली.