आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • For Countuing Income Select Apropriate Investment Means

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियमित उत्पन्नासाठी निवडा योग्य गुंतवणूक साधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बाजारात गुंतवणुकीची अनेक साधने उपलब्ध आहेत. लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांचा योग्य वापर केल्यास मोठी रक्कम उभी करता येते. प्रत्येकाची जोखीम स्वीकारण्याची क्षमता, उद्दिष्ट आणि अपेक्षित परतावा यावर कोणते साधन योग्य राहील हे ठरते. गुंतवणुकीतून मिळालेल्या परताव्याचा वापर आपल्या गरजेनुसार एकरकमी किंवा हप्त्याने करता येतो.त्यामुळे नियमित उत्पन्न देणा-या साधनांत गुंतवणूक करायला हवी. लक्ष्यानुसार परतावा देणा-या काही गुंतवणूक साधनांविषयी...
1. सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम : ही योजना केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे. याचा वापर रिटायरमेंट इन्कम किंवा पेन्शनच्या स्वरूपात होतो. यावरील व्याजदर दरवर्षी ठरतो. एकरकमी गुंतवणूक करावी लागते. पूर्ण कालावधीत तिमाही आधारित करयोग्य व्याज मिळते.
2.पोस्टाची मासिक उत्पन्न योजना : हेही एकरकमी गुंतवणुकीचे साधन आहे. याचे व्याज दरवर्षी ठरते, जे पूर्ण कालावधीसाठी असते. यात दर महिन्याला मिळणारे व्याज करयोग्य असते.
3. बँक / कॉर्पोरेट मुदत ठेवी : एफडीवर तिमाही किंवा मासिक व्याजाचा पर्याय निवडता येतो. हे लवचिक गुंतवणुकीचे साधन आहे. यात उद्दिष्टानुसार वेगवेगळ्या मुदतीच्या अनेक एफडी घेता येतात. समजा, आगामी चार वर्षांत मुला-मुलीच्या पदवीसाठी चार लाख रुपयांची गरज आहे. तर, एक ते चार वर्षांच्या मुदतीच्या चार वेगवेगळ्या एफडी काढता येतात.
4. म्युच्युअल फंड मासिक प्राप्ती योजना : ही योजना करमुक्त लाभांशासह पेन्शन इन्कम म्हणूनही साहाय्यभूत ठरते. म्युच्युअल फंड मासिक योजना लाभांशाच्या स्वरूपात करमुक्त उत्पन्न देऊ शकते. मात्र, हे उत्पन्न अनिश्चित असते. करसवलतीच्या मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असेल तर या योजना अधिक उपयुक्त ठरतात.
5 इमिडिएट एन्यूटी : नियमित उत्पन्नासाठी हे एक चांगले साधन आहे. आयुर्विमा कंपन्यांकडे हे उपलब्ध आहे. पूर्वी हे फक्त एलआयसीकडेच होते. आता मात्र पेन्शन प्लॅन विकणा-या सर्वच विमा कंपन्यांकडे हे उत्पादन आहे. इमिडिएट एन्यूटीचे पाच पर्याय आहेत. यामुळे स्वत:सह कुटुंबाला पेन्शन मिळण्यास मदत होते. सध्याच्या चढ्या व्याजदराच्या काळात यातील गुंतवणूक योग्य राहील.
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर गुंतवणुकीचे नियोजन आवश्यक आहे. उद्दिष्टाकडे दुर्लक्ष करून केवळ अंदाजे परताव्यावर विसंबून केलेली गुंतवणूक व्यर्थ आहे. त्यामुळे नियोजनपूर्वक गुंतवणूक करणे उचित ठरते.


लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल
प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.


manikaran.singal@dainikbhaskargroup.com