आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Fuel Saving , In Night Petrol Pump Close Down

इंधनाचा वापर कमी व्हावा यासाठी रात्रीच्या वेळी पेट्रोल पंप राहणार बंद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इंधनाचा वापर कमी व्हावा यासाठी रात्रीच्या वेळी पेट्रोल पंप बंद ठेवण्यावर सरकार विचार करत आहे. पेट्रोलियम मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी रविवारी बंगळुरूत ही माहिती दिली. तेलाच्या वाढत्या आयात बिलात कपात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना विचाराधीन आहेत. त्यात रात्री पंप बंद ठेवण्याचाही समावेश आहे. इंधनाच्या मागणीत 3 टक्के कपात व्हावी यासाठी 16 सप्टेंबरपासून व्यापक इंधन संरक्षण मोहीम सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे विदेशी चलनात 2.5 अब्ज डॉलर किंवा 16 हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकेल. इराणहून कच्चा तेलाची आयात वाढवून 8.5 डॉलरचे विदेशी चलन वाचवण्याचा भारताचा विचार आहे. इराणला भारत रुपयांत देयक अदा करतो.