आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आता स्वस्त आणि मस्त ग्लोबल सिमकार्ड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आंतरराष्ट्रीय पर्यटकांना वापरण्यास अत्यंत सुलभ आणि परवडणार्‍या किमतीतील ट्रॅव्हलर्स कॅरिअर हे जागतिक पातळीवरील सिमकार्ड हॉटमेल फेम साबीर भाटिया आणि योगेश पटेल यांनी स्थापन केलेल्या 'जेक्स्टर इंक' या कंपनीने बाजारात दाखल केले आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांच्या तुलनेत हे कार्ड 85 टक्के स्वस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे हे सिमकार्ड फीचर फोन्सपासून ते अँड्रॉइड, आयफोन, विंडोज आणि ब्लॅकबेरीच्या साधनांपैकी कोणत्याही उपकरणासाठी वापरता येते.

जेक्स्टर सिमच्या माध्यमातून अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि मेक्सिको किंवा युरोपात आणि आशियात कुठेही प्रवास करणारे प्रवासी आपल्या मोबाइल फोनद्वारे स्वस्तात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कॉल्स/ एसएमएस करू शकतात.

जेक्स्टर सिममध्ये एक सुलभ नोंदणी आणि ऑनबोर्डिंग प्रक्रिया तसेच पारदर्शक बिल यंत्रणा आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे छुपे दर आकारले जात नाहीत. एकाच सिमचा वापर व्हॉइस, टेक्स्ट आणि डेटा या सर्वांसाठी करता येतो. त्याचा वापर किती झाला आहे हे जेक्स्टरच्या वेबसाइटद्वारे पाहून त्यावर नियंत्रण ठेवता येते. दूरध्वनी, टेक्स्ट व ब्राउझिंगशिवाय व्हॉइसमेल, एसएमएस फॉरवर्ड करणे आणि व्हॉइसमेल टू ई मेल अशा अद्ययावत वैशिष्ट्यांचाही समावेश त्यात करण्यात आला असून त्यासाठी अतिरिक्त दर आकारले जात नाहीत. तसेच विविध देशांमध्ये एकच कार्ड वापरले जाऊ शकते आणि अनेक स्थानिक दूरध्वनी क्रमांक आपोआप प्रत्येक सहकार्य असलेल्या देशात पुरवले जातात. जॅक्स्टरचे वापरकर्ते आपल्या आवडत्या देशाचा एक दूरध्वनी क्रमांक कायमस्वरूपी एक छोटे मासिक शुल्क भरून आपल्यासाठी ठेवू शकतात. ते मासिक एक डॉलरएवढे कमी असू शकते. प्रवासादरम्यानच्या संवाद खर्चावर नियंत्रण ठेवू इच्छिणार्‍या भारतीय व्यावसायिकांसाठीही जेक्स्टर सिम हा एक आकर्षक पर्याय ठरू शकतो. या कमी खर्चिक उपाययोजनेबरोबरच कॉर्पोरेट प्लॅन्सवर खालील फायदे मिळू शकणार आहेत. हे कार्ड्स विमानतळावर सर्व ट्रॅव्हल्स एजंट्सकडे विमानतळांवर उपलब्ध असून ते ऑनलाइनही मिळू शकते. या माध्यमातून प्रवाशांना कमी खर्चातील उपाययोजना देण्यासाठी जागतिक दूरसंचार जाळे प्रदान करण्याची संधी यामुळे मिळाली असल्याचे जेक्स्टरचे अध्यक्ष आणि सहसंस्थापक योगेश पटेल म्हणाले.