आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉपिंगसाठी ऑनलाइन सल्ला घेताहेत ग्राहक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - ऑनलाइन शॉपिंगसह ग्राहक आता किमतींबाबत शोध, तपासणी आणि तुलना यासाठी ऑनलाइन प्राइज कम्पॅरिझन साइट्सची मदत घेत आहेत. अशा साइट्सवर दररोज २ ते ३ लाख ग्राहक सर्च करत आहेत. एकट्या जॉपरवर महिन्याकाठी १५ लाखांहून जास्तच ग्राहक विविध उत्पादनांच्या किमतींपासून ते इतर अनेक प्रकारची माहिती घेत आहेत. जॉपरचे चीफ मार्केटिंग ऑफिसर वैभल गर्ग यांनी सांगितले, आम्ही ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार विविध उत्पादनांच्या वेगवेगळ्या साइट्सवर असणा-या किमतींबाबत एकत्र माहिती देतो. एक वर्षापूर्वी जॉपरवर महिन्याकाठी ५ लाख ग्राहक असायचे, आता ही संख्या १५ लाखांपर्यंत वाढली आहे. पुढील वर्षापर्यंत ही संख्या २५ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता गर्ग यांनी व्यक्त केली.

डिजिटलची गरज - जॉपरसह देशातील हजारो ऑफलाइन स्टोअर्सही जोडलेले आहेत आणि जॉपरवर येणा-या ग्राहकांना या स्टोअर्समधील किमती व इतर माहिती यांची तुलना करण्याची संधी मिळते. गर्ग यांच्या मते, सर्व स्टोअर्सनी आता डिजिटल होण्याची वेळ आता आली आहे.