आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यशासाठी तुमच्या गुंतवणुकीचे करा नियोजन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुंतवणूक ही एक साधी प्र्रक्रिया आहे आणि तिच्यासाठी नियोजन, संयम आणि वेळ ह्यांची गरज असते. म्हणूनच आपली एक गुंतवणूक योजना असावी लागते आणि ती अमलात आणण्याचे धोरण असावे लागते. ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी, जोखीम हा गुंतवणुकीचा अविभाज्य घटक आहे आणि जोखीम व तिचे बक्षीस ह्यांच्यामध्ये थेट संबंध असतो हे गुंतवणूकदारांनी जाणून घेतल्यास त्याची मदत होईल. गुंतवणूक योजना तयार करण्याचा योग्य मार्ग हा की सध्याची वित्तीय स्थिती, गुंतवणूक उद्दिष्ट, जोखीम आणि मुदत ह्यांची व्याप्ती असे घटक ध्यानात घेतले जावेत. प्रत्येकाच्या मुदतीचा आवाका म्हणजे एखादे गुंतवणूक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेला वेळ यावर जोखमीची पातळी आणि प्रकार अवलंबून असतो. एखाद्या अल्पकालीन गुंतवणूकदारासाठी अस्थिरता ही मुख्य जोखीम असते. म्हणूनच अल्पकालीन गुंतवणूक धोरणाचा भर भांडवलाचे जतन करण्यावर असायला हवा. तथापि एखाद्या दीर्घ मुदतीतील गुंतवणूकदारासाठी महत्त्वाची बाब म्हणजे उत्पन्नाचा वार्षिकीकृत दर ही होय. कारण दीर्घ मुदतीत अस्थिरता कमीअधिक होत राहून तिचा प्रभाव राहत नाही. शिवाय दीर्घमुदतीमधील गुंतवणूकदारांसाठी चक्रवाढीने वृद्धी होण्याची भूमिका संपत्तिनिर्माणासाठी महत्त्वाची असते.
सुदैवाने वेगवेगळी जोखीम क्षमता असलेल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या गुंतवणूकदारांसाठी सुयोग्य असे विविध गुंतवणूक पर्याय आहेत. एखाद्या दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी इक्विटी हे इतर पर्यायांपेक्षा संभवत: अधिक चांगला पर्याय आहे. एखाद्या गुंतवणूकदाराला अल्प आणि मध्यम कालावधीत जास्त अस्थिरतेला तोंड द्यावे लागण्याची शक्यताही वाढते, पण ही जोखीम एखादा शिस्तबद्ध मार्ग चोखाळून आटोक्यात ठेवता येते, जेथे पैसे नियमितपणे गुंतवले जातात
सावध आणि पारंपरिक गुंतवणूकदारांच्या निवेश संचांमध्ये बँक ठेवी, बाँड्स, अल्पबचत योजना आणि कर्जरोखे हे पर्याय मुख्यत्वेकरून असतात व तसे अनेक वर्षे राहिलेले आहेत. जरी एक संवर्ग म्हणून कष्टाने मिळवलेल्या पैशाच्या सुरक्षिततेविषयी असलेली काळजी ही साधने घेत असली तरी संपत्तिनिर्माणामध्ये यापैकी बहुतेकांची काही भूमिका नसते. ह्याचे कारण ही साधने कमी उत्पन्न देतात, इतकेच नाही तर पीपीएफ वगळता ती करकार्यक्षमही नसतात. शिवाय रोखतेचा अभाव हा यापैकी बहुतेक साधनांमधील अडथळा असतो आणि निवेश संचामध्ये वेळोवेळी बदल करण्याची आवश्यक लवचीकता त्यामुळे नसते.
किमान निवेश संचाच्या काही भागासाठी तरी ह्यापलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि ऋण आणि म्युच्युअल फंड देऊ करीत असलेले ऋणसंबंधी निधी ह्यासारख्या पर्यायांचा शोध घ्यायला हवा. ते केवळ करकार्यक्षम आणि लवचीक आहेत, इतकेच नाही तर त्यांच्यामध्ये अधिक चांगले उत्पन्न देण्याची क्षमताही आहे.