आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ford Figo's Celebration Edition Launched In Market

फोर्ड फिगोची सेलिब्रेशन एडिशन बाजारात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फोर्ड इंडियाने फोर्ड फिगो भारतात सादर केली, त्याला तीन वर्षे झाली. त्यानिमित्त फोर्डने फिगोची सेलिब्रेशन एडिशन लाँच केली. या मर्यादित एडिशनचे डिझाइन फॅशन जगतातील निखिल आणि शांतनू या जोडीने केले आहे. फोर्ड इंडियाचे अध्यक्ष जोगिंदर सिंग यांनी सांगितले की, फॅशन जगतातील डिझायनरला प्रथमच ऑटोमोबाइल क्षेत्रात संधी मिळाली आहे. ग्राहकांची मते लक्षात घेऊन शांतनू आणि निखिल यांनी फिगोला आकर्षक लूक दिला आहे. मार्च 2010 मध्ये फिगो प्रथमच भारतात सादर करण्यात आली. तेव्हापासून 2 लाख 70 हजार फिगोंची विक्री झाली आहे.
लिमिटेड एडिशन
फोर्ड फिगो सेलिब्रेशन
रंग
फक्त डायमंड व्हाइट रंगात
फीचर्स
सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टिम, रिव्हर्स पार्क असिस्ट, लिमिटेड एडिशन सीट कव्हर्स, ब्रँडेड स्कफ प्लेट्स, स्पेशल बॅज.
किंमत
4,15,999 रुपये