आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट गुंतवणुकीचा ओघ आटला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जगातील डळमळीत आर्थिक स्थितीचा फटका भारतात होणा-या थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) बसला आहे. फेब्रुवारीमध्ये 1.79 अब्ज डॉलरचा निधी एफडीआयद्वारे आला. एफडीआयमधील ही घट 19 टक्के आहे.
गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये एफडीआयच्या माध्यमातून 2.21 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली होती. यंदाच्या जानेवारीमध्ये 2.15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाल्याचे उद्योग प्रोत्साहन मंत्रालयाच्या अधिका-यांनी सांगितले. एप्रिल ते मार्च 2012-13 या काळात देशातील एफडीआयचे प्रमाण 38 टक्क्यांनी घटले आहे.