मुंबई - संरक्षण क्षेत्रानंतर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आता रेल्वे क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीचे (एफडीआय) नियम शिथिल करण्याचा विचार करीत आहे. अतिजलद रेल्वे तसेच मालवाहतूक क्षेत्रात 100 टक्के विदेशी थेट गुंतवणुकीला परवानगी देण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन परिषदेने याबाबतचा एक मसुदा आंतरमंत्रालयीन सल्लामसलतीसाठी वितरित केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. विदेशी थेट गुंतवणुकीला परवानगी देता येऊ शकेल अशा रेल्वेतील सर्व विभागांची चाचपणी करण्यात येत आहे.