आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foreign Direct Investment's 12 Proposal Sanctioned

थेट विदेशी गुंतवणुकीच्या 12 प्रस्ताव मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फॅशनच्या जगतातील आघाडीच्या हेन्स अँड मुमताज या ब्रँडसह थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) 12 प्रस्तावाला सरकारने सोमवारी हिरवा कंदील दाखवला. यामुळे 821.63 कोटी रुपये गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याचे वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले. यात सीजीपी इंडिया इन्व्हेस्टमेंटचा 10,141 कोटी रुपयांच्या प्रस्तावावर मंडळाच्या पुढील बैठकीत चर्चा होणार आहे. मंजुरी मिळालेल्या प्रस्तावात हेन्स अँड मुमताज या ब्रँडचा 720 कोटी रुपयांच्या प्रस्तावाचा समावेश आहे. हा ब्रँड देशभरात त्यांची दुकाने थाटणार आहे.
मंजुरी मिळालेल्या प्रस्तावात मॉरिशसचा बे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, व्हियाकॉम 18 मीडिया, हॅवको पेट्रोफेर, जबीर हसन चौधरी आणि तसनिम अहमद (दोन्ही बांगलादेश) व मॉरिशसचा ग्रीन डेस्टीनेशन्स होल्डिंग यांचा समावेश आहे. तर गेचको एशिया, पी-5 एशिया होल्डिंग यांच्यासह चार प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या काळात देशाच्या थेट विदेशी गुंतवणुकीत 4 टक्के वाढ होऊन एफडीआय 8.46 अब्ज डॉलरवर पोहोचली.