आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा आटला, पहिल्या सहामाहीत 11 टक्के घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशात येणारा विदेशी थेट गुंतवणुकीचा ओघ सप्टेंबर महिन्यात 38 टक्क्यांनी घटला असल्याचे औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन परिषदेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. वार्षिक आधारावर ही गुंतवणूक मागील वर्षातल्या याच कालावधीतील 4.67 अब्ज डॉलरवरून आता 2.91 अब्ज डॉलरवर आली आहे. विद्यमान आर्थिक वर्षातल्या पहिल्या सहामाहीमध्ये विदेशी थेट गुंतवणुकीचे प्रमाण 11 टक्क्यांनी कमी होऊन ते अगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील 12.84 अब्ज डॉलरवरून 11.37 अब्ज डॉलरवर आले आहे.
विदेशी गुंतवणूक : 2011 - 12 : 36.50 अब्ज डॉलर 2012-13 : 22.42 अब्ज डॉलर
या क्षेत्रांत सर्वात कमी ओघ : सेवा, दूरसंचार, हवामान उद्योग
एप्रिल ते सप्टेंबर एफडीआयचा कल
क्षेत्र रक्कम
सेवा 1.32 अब्ज डॉलर
दूरसंचार 32 अब्ज डॉलर
हवामान 240 अब्ज डॉलर.
सहामाहीतील एफडीआय
क्षेत्र रक्कम
सेवा3.04 अब्ज डॉलर
दूरसंचार43 दशलक्ष डॉलर
हवामान685 दशलक्ष डॉलर
सरकारच्या उपाययोजनांमुळे गुंतवणुकीला पाठबळ
केंद्र सरकारने अलीकडेच दूरसंचार, चहा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासह 12 क्षेत्रांमधील विदेशी थेट गुंतवणुकीचे धोरण शिथिल केले आहे. त्यामुळे सरकारने अलीकडेच केलेल्या उपाययोजनांमुळे देशातील गुंतवणुकीचे वातावरण सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदेशी थेट गुंतवणुकीचा ओघ देशात येण्यास गती मिळेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.