आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foreign Investors In India News In Divya Marathi

विदेशी गुंतवणूकदार संस्था, बाजारावर फिदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकानंतर केंद्रात स्थिर सरकार येणार अशा अपेक्षा भांडवल बाजारालाही वाटू लागल्या आहेत. विशेष म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्थादेखील याच आशेमुळे भांडवल बाजारावर फिदा झाल्या आहेत. सतत खरेदीचा सपाटा लावलेल्या या गुंतवणूकदारांनी या महिन्यात तब्बल 7,764 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या वर्षाच्या प्रारंभापासून आतापर्यंत या गुंतवणूकदारांनी एकूण 29,960 कोटी रुपयांची गुंतवणूक समभाग बाजारपेठेत केली आहे.

स्थिर सरकारच्या अपेक्षेने येणार्‍या काही आठवड्यातही हा सकारात्मक कल असाच कायम राहण्याचा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने या महिन्यात 243 अंकांची उसळी घेतली आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून 11 एप्रिलपर्यंत संपलेल्या आठवड्यात 7,764 कोटी रुपयांची गुंतवणूक बाजारात झाल्याचे बाजार नियंत्रक ‘सेबी’ची आकडेवारी सांगते. याच कालावधीत कर्ज बाजारपेठेतून या गुंतवणुकदारांनी 2,897 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली.