आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Foreign Investors In The Mode Of Wait And Watch Due To Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेशी गुंतवणूकदारांचे निवडणुकांमुळे वेट अँड वॉच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतात गुंतवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणूकदार देशाच्या बांधावर उभे आहेत. या गुंतवणूकदारांना प्रतीक्षा आहे ती आगामी काळात होणा-या निवडणुकीची, असे मत फिच या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने गुरुवारी व्यक्त केले. काही विदेशी गुंतवणूकदारांनी देशात गुंतवणूक केली आहे, तसेच आणखी गुंतवणुकीसाठी मात्र ते निवडणुकीच्या निकालाची वाट पाहताहेत, असे मत फिचचे भारतातील सीईओ व एमडी अतुल जोशी यांनी व्यक्त केले.

जोशी म्हणाले, भारतात वाढीच्या अनेक संधी असल्याचे विदेशी गुंतवणूकदारांचे मत आहे. त्यामुळे त्यांनी देशात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या गुंतवणुकीसाठी ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. ही योग्य वेळ आगामी निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे. आर्थिक सुधारणा कशा रीतीने अमलात येतात याकडेही विदेशी गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष आहे. देशात 2014 च्या पहिल्या तिमाहीत लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. गुंतवणूक करावी की आणखी 12 ते 18 महिने थांबावे, असाही विचार गुंतवणूकदार करत आहेत.