आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Us Employees Of Infosys Allege Hindi Bias, News In Marathi

इन्फोसिसविरुद्ध भेदभाव केल्याचा आरोप; अमेरिकन कर्मचार्‍यांनी दाखल केली याचिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील प्रमुख आयटी कंपनी 'इन्फोसिस'च्या माजी अमेरिकन कर्मचार्‍यांनी कंपनी विरोधात खटला दाखल केला आहे. इन्फोसिसविरोधात कर्मचार्‍यांनी भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. कर्मचारी हिंदी भाषेत संभाषण करू शकत नव्हते. यावरून कंपनी आणि अन्य कर्मचारी आपल्याशी भेदभाव करत असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.

दुसरीकडे, इन्फोसिसने माजी कर्मचार्‍यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. कर्मचार्‍यांचे आरोप खोटे आणि तथ्यहीन असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी म्हटले आहे. कंपनीचे माजी कर्मचारी लाल्या बोल्टन, ग्रगोर हँडलूजर, ब्रेंडा कोहलर व केली पार्कर या चौघांनी ही याचिका दाखल केली आहे.
विस्कान्सिनच्या पूर्वेकडील अमेरिकन जिल्हा कोर्टात ही याचिका दाखल केली आहे.

कंपनीने बोल्टन याला 'टेस्टर' या पदावर नियुक्त केले होते. तसेच हँडलूजर हा इन्फोसिसमध्ये 2004 मध्ये विक्री व्यवस्थापक म्हणून रुजू झाला होता. सुपरवायझर व अन्य सहकारी कामाच्या बाबत तसेच संभाषणात वेगळे ठेवत होते. अन्य कर्मचारी नियमित हिंदी भाषेत बोलत होते. आम्हाला हिंदी भाषा बोलता येत नसल्याने त्यांनी आम्हाला अशी वागणूक दिली.
अमेरिकन कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत इन्फोसिस टेक्नोलॉजीज लिमिटेड आणि इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेजला आरोपी करण्‍यात आले आहे. ही याचिका माग‍िल वर्षी ऑक्टोबर महिन्यात दाखल केली होती. इन्फोसिसच्या वकीलांनी कोर्टाला खटला रद्द करण्‍याची मागणी केले आहे.