केंटूकी येथील फोर्ट नॉक्स येथे असलेल्या बुलियन डिपॉझिटरीमध्ये जगातील सर्वाधिक सोने ठेवलेले आहे. येथे 4577 मॅट्रीक टन सोने ठेवण्यात आला आहे, हे सोने मानव इतिहासातील काढण्यात आलेल्या सोन्याचा जवळपास 40 वा भाग असल्याचे मानण्यात येते.
1936 मध्ये अमेरिकेच्या कोषागार विभागाने (ट्रेझरी डिपार्टमेंट) केंटुकीमधील या फोर्ट नॉक्समध्ये युनायटेड स्टेस्ट्स बुलियन डिपॉझिटरीच्या निर्मितीला सुरूवात केली. अमेरिकन कोषागार विभागाला ही जमीन अमेरिका मिल्ट्रीने हस्तांतरीत केली होती. या तिजोरीचे निर्माणकार्य डिसेंबर 1936 मध्ये पुर्ण झाले होते. ही तिजोरी बनवण्यासाठी त्यावेळी 5.6 लाख अमेरिकी डॉलर एवढा खर्च आला होता. 1988 मध्ये याचा जागेचा अमेरिकेच्या नॅशनल रजिस्टर ऑफ हिस्टॉरिक प्लेसेस (ऐतिहासिक वास्तूंची राष्ट्रीय सुची) मध्ये समावेश करण्यात आला.
अमेरिका फेडरल रिझर्व्हच्या न्यूयॉर्क कार्यालयातील सुवर्ण कक्षामध्ये यापेक्षाही जास्त सोने आहे, मात्र त्यामध्ये वेगवेगळ्या देशांचे आणि संघटनेच्या सोन्याचा समावेश आहे. यामध्ये रस्त्याच्या पृष्ठभूमीपासून 80 फूट खोल एक सुवर्णकक्ष आहे. ज्यामध्ये अंदाजे 7,000 मॅट्रीक टन सोने ठेवण्यात आले आहे. हे सोने जगाच्या चलनातील सोन्याच्या जवळपास 10वा भाग आहे. तर जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण ग्रॅसबर्ग (पापूआ, इंडोनेशिया) येथे आहे.