आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फॉर्च्युन 500’ यादीत रिलायन्स; यादीत आठ भारतीय कंपन्यांचा समावेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘फॉर्च्युन’ या प्रसिद्ध मासिकाने जाहीर केलल्या जगातील अव्वल 500 बड्या कंपन्यांच्या यादीत आठ भारतीय कंपन्यांना स्थान मिळण्याचा बहुमान मिळाला आहे. परंतु त्यातही रिलायन्स इंडस्ट्रीज ही ‘फॉर्च्युन ग्लोबल 500’ यादीतील अव्वल 100 कंपन्यांमध्ये स्थान पटकावणारी भारतातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे. तसेच यादीत समावेश होणारी इंडियन आॅइल ही सार्वजनिक क्षेत्रातील पहिली कंपनी बनली आहे.
यादीत स्थान मिळवणाºया आठ भारतीय कंपन्यांमध्ये पाच कंपन्या या सार्वजनिक क्षेत्रातील आहेत. त्यात इंडियन आॅइलने 86,016 दशलक्ष डॉलर्सचा महसुल मिळवून 83 वे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षात हीच कंपनी 98 व्या स्थानावर होती. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वाखालील रिलांयन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने गेल्या वर्षातल्या 134 व्या स्थावरून एकदम वरची उडी मारत 99 वे स्थान पटकावले आहे. वार्षिक 76,119 दशलक्ष डॉलर्सच्या महसुलाची नोंद करीत अव्वल 100 कंपन्यांमध्ये स्थान मिळवणारी खासगी क्षेत्रातील ही पहिली भारतीय कंपनी बनली आहे.
आयओसी आणि रिलायन्स व्यतिरिक्त या यादीत झळकणाºया अन्य भारतीय कंपन्यांमध्ये टाटा स्टील, टाटा मोटर्स, बीपीसीएल, एचपीसीएल, ओएनजीसी तसेच स्टेट बॅँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बॅँकेचा देखील समावेश आहे. मूळ भारतीय वंशाचे नेतृत्त लाभलेल्या सिटीग्रूप आणि अर्सेलरमित्तल या कंपन्यांना देखील यादीत मानाचे स्थान मिळाले आहे.
विदेशी कंपन्यांमध्ये रॉयल डच शेल कंपनीने 484,489 दशलक्ष डॉलर्सचा महसूल मिळवून गेल्या दोन वर्षांपासून टॉपवर असलेल्या वॉलमार्ट या कंपनीला मागे टाकले आहे. या यादीत ऊर्जा क्षेत्रातील एक्झॉन मोबील दुसºया क्रमांकावर आहे.
कंपनी स्थान महसूल
इंडियन ऑइल 83 86,016
रिलायन्स इंडस्ट्रीज 99 76,119
बीपीसीएल 225 44,582
एचपीसीएल 267 38,885
एसबीआय 285 36,950
टाटा मोटर्स 314 34,575
ओएनजीसी 357 30,746
टाटा स्टील 401 27,739
वार्षिक महसूल आकडे दशलक्ष डॉलर्समध्ये