आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fortune List : Google's Job Very Well In America

फॉर्च्युनची यादी: अमेरिकेत सर्वात चांगली नोकरी गुगलची!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूयॉर्क - उद्योगविश्वातील विख्यात फॉर्च्युन मासिकाने अमेरिकेत नोकरीसाठी पसंती असणा-या आघाडीच्या 100 कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. इंटरनेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलने या यादीत सलग पाचव्यांदा अव्वल स्थान मिळवले आहे. फॉर्च्युनकडून जारी करण्यात आलेल्या 100 बेस्ट अमेरिकन कंपनी ‘टू वर्क फॉर’ या शीर्षकाच्या यादीत गुगलनंतर सॉफ्टवेअर विकासक एसएएस कंपनीने दुसरे स्थान पटकावले आहे. स्ट्रेटजी कन्सल्टंट बोस्टन कन्सल्टिंग समूहाने (बीसीजी) तिसरे स्थान मिळवले आहे.
गुगलचे सर्व कर्मचारी त्यांचे समभागधारक आहेत आणि 2013 मध्ये गुगलचा समभाग 1000 डॉलरच्या पार गेला आहे. कंपनीच्या सर्व कर्मचा-यांसाठी हे वरदान आहे. फॉर्च्युनच्या मते, गुगल पुन्हा एकदा या यादीत अव्वलस्थान पटकावण्यात यशस्वी ठरली आहे. यासह गुगलने आठव्यांदा या यादीत स्थान मिळवले असून त्यापैकी पाच वेळा गुगल क्रमांक एकवर राहिली. फॉर्च्युनच्या मते, गुगलच्या कर्मचा-यांना मिळणा-या सुविधा कंपनी परिसरापुरत्याच मर्यादित नाहीत. कंपनीच्या परिसराबाहेरही कर्मचा-यांना अनेक सुविधा गुगलकडून मिळतात. त्यामुळेच गुगलने पुन्हा एकदा फॉर्च्युनच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.
अव्वल 10 क्रमांकांत स्थान पटकावण्यात आर्थिक सेवा क्षेत्रातील एडवार्ड जोन्स कंपनीने चौथे स्थान तर मॉर्गेज कर्जदाता क्लिकेन लोन्स, तर सहाव्या क्रमांकावर जैवतंत्रातील अव्वल जीनटेक कंपनीने स्थान मिळवले आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी सेल्सफोर्स डॉट कॉम सातवा क्रमांक मिळवण्यात यशस्वी ठरली. यादीनुसार सॉफ्टवेअर कंपनी इनट्यूट, नवव्या क्रमांकावर आर्थिक सेवा क्षेत्रातील रॉबर्ट डब्ल्यू बेअर्ड अँड कंपनी, तर दहाव्या स्थानी डीपीआर कन्स्ट्रक्शन ही कंपनी आहे.
ही यादी तयार करण्यासाठी फॉर्च्युनने ग्रेट प्लेस टू वर्क या संस्थेशी करार केला होता. त्याअंतर्गत संस्थेने कंपन्यांत काम करणा-या 2,52,000 कर्मचा-यांशी चर्चा केली. फॉर्च्यूनच्या मते, एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी असणारी व पाच वर्षे जुनी एकाही अमेरिकन कंपनीला यादीत स्थान मिळवता आलेले नाही.
टॉप 10 कंपन्या
1) गुगल
2) एसएएस
3) बीसीजी
4) एडवार्ड जोन्स
5) क्विकेन लोन्स
6) जीनटेक
7) सेल्सपोसई डॉट कॉम
8) इनट्यूट
9) रॉबर्ट डब्ल्यू बेयर्ड अँड कंपनी
10) डीपीआर कन्स्ट्रक्शन
का आहे गुगल क्रमांक एक ?
गुगलकडून कर्मचा-यांना अनेक सुविधा देण्यात येतात. या सुविधा केवळ कंपनीच्या कार्यालय परिसरापुरत्या मर्यादित नसून परिसराच्या बाहेरही सुविधा मिळतात.