आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घसरणीचा घाट पार, 8 महिन्यांनंतर वाहन विक्रीत तेजीचा गिअर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- केंद्र सरकारने वाहनांवरील अबकारी शुल्कात केलेली कपात आणि नवी दिल्लीत झालेल्या ऑटो एक्स्पो प्रदर्शनातील सकारात्मक वातावरणामुळे मोटार कंपन्यांनी अखेर विक्रीचा टॉप गिअर टाकला आहे. सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच मोटारींच्या विक्रीमध्ये फेब्रुवारीत 1.39 टक्क्यांनी वाढ झाली आहे; परंतु तरीही वाहन उद्योगाच्या भविष्यातील वाढीबाबत मात्र ‘सियाम’ने मात्र सावध अंदाज व्यक्त केला आहे.

वाहन बाजारातील सध्याची नकारात्मक भावना सकारात्मकतेकडे वळण्यासाठी आणखी थोडा वेळ लागणार आहे; परंतु तरीही विक्रीत वाढ झाल्याबाबत कंपन्यांकडून आम्हाला प्रतिसाद मिळत असल्याचे ‘सियाम’चे महासंचालक विष्णू माथूर यांनी सांगितले.

अबकारी शुल्क कपात आणि ऑटो एक्स्पोला मिळालेला प्रतिसाद यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे; परंतु त्याचे रूपांतर विक्रीत होईल का हे खूप अगोदर बोलल्यासारखे होईल. प्रत्येक महिन्यात वाहनांच्या विक्रीत चढ- उतार आतापर्यंत बघायला मिळत असून वाहन विक्रीचा कल दिसत नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

मार्चमध्ये वाहनांच्या विक्रीत चांगली सुधारणा झाली असली तरी उर्वरित आर्थिक वर्षात हा परिणाम दिसणार नाही. त्यामुळे विद्यमान आर्थिक वर्ष प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांसाठी नकारात्मक जाणार आहे. पुढील आर्थिक वर्षात केंद्रात नवीन येऊन विविध क्षेत्रांसाठी धोरण जाहीर करेल तसेच विविध प्रकल्पांना मंजुरी मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

0 व्यावसायिक वाहने : -29,84 47,982 (सलग दहाव्या महिन्यात घसरण)
0 एकूण वाहन विक्री (एप्रिल ते फेब्रु.) :1,58,512, 1,60,718 + 1.39 }

शुल्क कपातीचा फायदा
हंगामी अर्थसंकल्पात अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोटारी, स्कूटर्स, मोटारसायकल आणि व्यावसायिक वाहनांवरील अबकारी शुल्क 12 टक्क्यांवरून कमी करून आठ टक्क्यांवर आणला. एसयूव्हींवरील 30 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर, मध्यम आकाराच्या मोटारींवरील अबकारी कर 24 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर आणि मोठय़ा मोटारींवरील अबकारी कर 27 टक्क्यांवरून 24 टक्क्यांवर आणला होता.

वाहन विक्रीचा कल
कंपनी फेब्रुवारी 2013 फेब्रुवारी 2014
मारुती सुझुकी 83,865 84,595
ह्युंदाई 33,936 33,875