आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोक्सवॅगनच्या पोलो, व्हेन्टो गाड्या महागल्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फोक्सवॅगनने काही कारच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने हॅचबॅक श्रेणीतील पोलो व सेडान श्रेणीतील व्हेन्टो या कारच्या किमती 2.27 टक्क्यांनी वाढवल्या. ही वाढ सोमवारपासून लागू झाली. या वाढीमुळे पोलोची किंमत आता 4.92 ते 7.08 लाख रुपये झाली. तर व्हेन्टोची किंमत 7.32 ते 9.96 लाख रुपये (एक्स शो-रुम दिल्ली) झाली.

या दोन्ही कारमध्ये अनेक फीचर्स नव्याने समाविष्ट करण्यात आले असून त्यांच्या किमती 2.27 टक्क्यांनी वाढवण्यात येत असल्याचे कंपनीच्या प्रवासी कार विभागाचे एम. डी. अरविंद सक्सेना यांनी सांगितले. ते म्हणाले, पोलो आणि व्हेन्टोमध्ये आता ब्ल्यूटूथ अ‍ॅडव्हान्स्ड म्युझिक सिस्टिम, यूएसबी आणि
हवामान आधारित एअर कंडिशनर यासारखे फीचर्स वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे किंमत वाढवण्यात आली आहे.