आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंतवणूकदारांना फसवल्यास नफ्याच्या तिप्पट दंड भरावे लागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - फसव्या गुंतवणूक योजनांमार्फत भोळ्याभाबड्या गुंतवणूकदारांना गंडा घालणा-या पाँझी स्कीमची नियमावली केंद्र सरकारने आणखी कडक केली आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांची लुबाडणूक करून बेकायदेशीर माया गोळा करणा-या या कंपन्यांना सध्याच्या केवळ एक कोटी रुपयांच्या तुलनेत या कंपन्यांना आता तीनपट जास्त दंड भरावा लागणार आहे.


फसवणा-या योजनांमार्फत बेकायदेशीरपणे रक्कम गोळा करणा-या कंपन्यांना वेसण घालण्यासाठी विद्यमान दंडाची रक्कम पुरेशी नाही. त्यामुळे गैरमार्गाने संघटित गुंतवणूक योजना चालवणा-या कंपन्यांच्या दंडात्मक रकमेत दणदणीत वाढ करण्याचा निर्णय भांडवल बाजार नियंत्रक ‘सेबी’ने घेतला आहे. या संंदर्भातील प्रस्तावाला ‘सेबी’ने मंजुरी दिलेली असून त्याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
सध्याच्या प्रचलित नियमानुसार बेकायदेशीर रक्कम गोळा करणा-या कंपन्यांना जास्तीत जास्त एक कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद आहे; परंतु आता नव्या नियमानुसार या कंपन्यांना त्यांनी कमावलेल्या नफ्याच्या तिप्पट दंड भरावा लागणार आहे.


काही प्रकरणांमध्ये बेकायदेशीर संघटित गुंतवणूक योजना राबवणा-या कंपन्यांनी काही हजारो कोटी रुपयांच्या पटीत रक्कम गोळा केली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सध्याची दंडाची रक्कम फारच अपुरी असल्याचे बाजार नियंत्रकांना दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यमान नियमांमध्ये बदल करून ही दंडात्मक रक्कम 25 कोटी रुपये किंवा त्यांनी कमावलेल्या नफ्याच्या रकमेच्या तुलनेत तीनपट जास्त दंड आकारण्याचा निर्णय ‘सेबी’ने घेतला आहे.


कडक पावले
कष्टाने कमावलेल्या मिळकतीवर डल्ला मारत गुंतवणूकदारांची घोर फसवणूक करणा-या बेकायदेशीर गुंतवणूक योजनांना अर्थात पाँझी योजनांना चाप लावण्यासाठी आता कठोर पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम संकलनाचा संबंध असलेल्या अशा योजनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश बाजार नियंत्रकांनी दिले आहेत.