आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्री रोमिंगचा मार्ग आता सुलभ...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - टेलिकॉम क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी मोफत रोमिंगला अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे मोफत रोमिंग देशभर लागू करण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. दूरसंचार विभागातील (डॉट) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील प्रमुख कंपन्या मोफत रोमिंगच्या बाजूने आहेत. त्यामुळे 2013 मध्ये देशभर मोफत रोमिंग सुरू करणे सोपे जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी अनेक कंपन्या याच्या विरोधात होत्या. मात्र आता परिस्थिती बदलली असून अनेक कंपन्या मोफत रोमिंगच्या बाजूने आहेत. तीन ते चार प्रमुख कंपन्यांनी दूरसंचार नियंत्रक व नियामक ट्रायला दिलेल्या सूचनांमध्ये याचे संकेत दिले आहेत. असे असले तरी देशातील भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आदी प्रमुख जीएसएम मोबाइल कंपन्या अद्यापही मोफत रोमिंगच्या विरोधात आहेत.


मात्र, व्हिडिओकॉनने अलीकडेच आपल्या नेटवर्कवरील रोमिंग चार्ज माफ केला आहे. त्यामुळे मोफत रोमिंगचा मार्ग खुला झाला आहे. तसेच दिल्ली सर्कलमधील ग्राहकांना व्हिडिओकॉनने रोमिंगवर सवलत दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी एक आघाडीची कंपनी लवकरच रोमिंगवरील शुल्क माफ करण्याच्या तयारीत आहे.
सूत्रांनुसार, अशा पद्धतीने जर चार ते पाच कंपन्यांनी रोमिंग मोफत केले तर बाजारातील इतर कंपन्या स्वत:हून रोमिंग मोफत करण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे दूरसंचार विभागाला ऑक्टोबर 2013 पर्यंत देशभरात मोफत रोमिंग करणे सुलभ जाणार आहे.


ठोस संकेत
टेलिकॉम क्षेत्रातील तीन ते चार दिग्गज कंपन्यांनी ट्रायला दिलेल्या सूचनांत मोफत रोमिंगचे संकेत दिले आहेत.
काय होणार चार ते पाच कंपन्यांनी रोमिंग मोफत केले तर बाजारातील इतर कंपन्या स्वत:हून रोमिंग मोफत करण्याची शक्यता आहे.


पुढचे पाऊल
व्हिडिओकॉनने अलीकडेच आपल्या नेटवर्कवरील रोमिंग चार्ज माफ केला आहे. त्यामुळे मोफत रोमिंगचा मार्ग खुला झाला आहे.