आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे, नाशकात फ्री वायफाय, बीएसएनएलचे देशभरात वेगवान नेटवर्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बीएसएनएलने देशभरात वेगवान नेटवर्क उभारण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. विनाअडथळा वेगवान थ्रीजी सेवा देण्यासाठी बीएसएनएलने देशभरात ५० हजारांपेक्षा जास्त हॉटस्पॉट लावण्याची योजना आखली आहे. त्यामुळे देशभरातील ४५ शहरांत वर्षभराच्या आत फ्री वायफाय सेवा उपलब्ध होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक या शहरांचाही यात समावेश आहे.

ही योजना कार्यान्वित करण्यासाठी बीएसएनएलला १४ हजार कोटी रुपये लागणार आहेत. हॉटस्‍पॉटच्या माध्यमातून विनाअडथळा थ्रीजी नेटवर्क उपलब्ध करून देण्याचा बीएसएनएलचा प्रयत्न आहे. याअंतर्गत विद्यापीठ, महाविद्यालये, रेल्वेस्टेशन, बसस्थानके आदींसह सार्वजनिक उपयोगांच्या सेवांच्या ठिकाणी ही सेवा उपलब्ध आहे. याशिवाय थ्रीजी सेवेचा वेग कायम राखण्यासाठी ५० हजार स्पॉट तयार केले जाणार आहेत. बीएसएनएलचे सीएमडी अनुपम श्रीवास्तव यांनी "दिव्य मराठी नेटवर्क'ला ही माहिती दिली.

सांगितले की, वायफायसाठी लागणाऱ्या आवश्यक उपकरणांची खरेदी करण्यात आली असून यंत्रणा बसवण्याचे काम या वर्षीच्या मध्यापर्यंत सुरू होणार आहे. पहिल्या २० -२५ मिनिटांपर्यंत ग्राहकांना फ्री वायफाय देणार असून नंतरचा खर्च उचलण्यासाठी विविध कंपन्यांसोबत जाहिरात करार केले जातील. थ्रीजी सर्व्हिसचे हॉटस्पॅाट तयार करण्याच्या कामावर ६,००० कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे काम तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. सध्या ऑप्टिकल फायबर अंथरण्याचे व केबल टाकण्याचे काम सुरू आहे. आम्ही टॉवर किरायाने देऊनही उत्पन्न मिळवणार आहोत.
* मुंबईसह देशातील ४५ शहरांचा योजनेत समावेश
* बीएसएनएल ५० हजार हॉटस्‍पॉट लावणार

बीएसएनएल - एमटीएनएलच्या विलीनीकरणात अडथळे
बीएसएनएल व एमटीएनएलच्या विलीनीकरणात तीन मुद्दे अडथळे ठरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनातील फरक हा मुख्य अडथळा आहे. तसेच बीएसएनएल ही लिस्टेड कंपनी आहे. एमटीएनएल नाही. तिसरा मुद्दा एमटीएनएलचा तोटा जास्त आहे. या तीन मुद्द्यांवर मार्ग निघाल्यास विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.
या शहरांत मिळणार सेवा
योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुणे, मुंबई, नाशिकसह भोपाळ, इंदूर, जयपूर, जोधपूर, लुधियाना, जबलपूर, अमृतसर, चंदिगड, जालंधर, लुधियाना, ग्वाल्हेर, रांची, पाटणा आदी शहरांत फ्री वायफाय सेवेची सुरुवात होणार आहे.