आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फंडांचा शेअर्स खरेदीचा सपाटा सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - म्युच्युअल फंड कंपन्यांकडून समभाग खरेदीचा सपाटा सुरूच आहे. ऑक्टोबरमध्ये फंडांनी भांडवल बाजारात ६००० कोटी रुपये ओतले आहेत. शेअर बाजारातील तेजीवर स्वार असलेल्या फंडांनी यंदाच्या वर्षात भरभरून खरेदी केली आहे.
बाजार नियंत्रक सेबीकडील आकडेवारीनुसार म्युच्युअल फंडांनी ऑक्टोबरमध्ये १७,४८३ कोटी रुपयांची खरेदी केली, तर ११,५४३ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. त्यामुळे फंडांनी एकूण ५९४० कोटी रुपयांची खरेदी केल्याचे स्पष्ट झाले.
म्युच्युअल फंडाकडून भांडवल बाजारातून भरभरून खरेदी होण्याचा हा सलग सहावा महिना आहे. केंद्रात नवे सरकार आले आणि या सरकारने आर्थिक सुधारणेची पावले टाकण्याचे संकेत दिल्यानंतर फंडांकडून सहा महिन्यांपूर्वीच हा खरेदीचा धडाका सुरू झाला होता, तो ऑक्टोबरमध्येही कायम राहिला.

गेल्यावर्षीच्या सप्टेंबरपर्यंत भांडवल बाजारातील प्रमुख विक्रीत मोटा वाटा असलेले फंड लोकसभा निवडणुकांपासून बाजारातील मोठे खरेदीदार म्हणून पुढे आले आहेत. यंदाच्या (२०१४) आतापर्यंतच्या १० महिन्यांत फंडांनी १४,००० कोटींची समभाग खरेदी केली आहेत, तर १४२०८ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे. वर्ष २०१२-१२ मध्ये फंडांनी २२,७४९ कोटींच्या समभागांची विक्री केली होती.