आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gadget World: Galaxy Completing Photography Hobby

गॅजेटच्या जगात: नव्या गॅलक्सीमुळे स्मार्टफोनप्रेमी लुटणार फोटोग्राफीची मजा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्मार्टफोनचा वापर हल्ली संवादापेक्षाही फोटोग्राफीसाठीच जास्त केला जातो. त्यामुळे आपल्या मोबाइलमधील कॅमेरादेखील स्मार्ट असलाच पाहिजे असा प्रत्येकाचा हट्ट असतो. नेमकी हीच उणीव भरून काढताना सॅमसंगने आपल्या नव्या ‘गॅलक्सी एस फोर झूम’ या स्मार्टफोनला थेट ‘झूम’ सुविधा देऊन मोबाइल बाजारात नवीन खळबळ उडवून दिली आहे. त्याच्यासोबतच अतिशय निमुळता आणि सहज हाताळता येणा-या नव्या ‘गॅलक्सी एस फोर मिनी’ या आणखी एका स्मार्टफोनची भेटदेखील दिली आहे.


परस्परांमधील संवाद अधिकाधिक दृश्य बनू लागला आहे. लोकांना त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण शक्य तितक्या उच्च दर्जाच्या फोटोत पकडून ठेवावेसे वाटतात. गॅलक्सी झूममुळे ही गरज पूर्ण होते. यात आधुनिक कार्यक्षमता आणि गॅलक्सी एस 4 समवेतचा संपर्क यांचा मेळ साधण्यात आल्याने तुम्हाला कॉम्पॅक्ट कॅमे-याकडून उच्च दर्जाचा फोटोग्राफिक अनुभव मिळतो.


दुसरीकडे गॅलक्सी मिनीमुळे ग्राहकांना गॅलक्सी एस 4 चा अनुभव नवीन प्रकारे अनुभवण्याची संधी मिळणार असल्याचे सॅमसंग मोबाइलचे संचालक मनू शर्मा यांनी अनावरणप्रसंगी बोलताना सांगितले. झूम रिंगमुळे पारंपरिक कॅमेरा झूमच्या नियंत्रणात क्रांतिकारी बदल झाले आहेत.


गॅलक्सी एस फोर झूमचे फीचर्स
० लांबून किंवा जवळून सुंदर प्रतिमा घेण्यासाठी एक्स ऑप्टिकल झूम आणि 16 एमपी बीएसआय सीएमओएस सेन्सर
० बिल्ट-इन ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझर (ओआयएस) मुळे कॅमेरा स्थिर राहण्यास मदत
० झेनॉन फ्लॅशमुळे कमी प्रकाशातही उच्च दर्जाचे फोटो
० ‘फोटो सजेस्ट’ द्वारे निवडक फोटोग्राफरनी काढलेल्या फोटोंच्या लायब्ररीशी जोडले जाऊन चांगले फोटो जगभरात पाठवणे शक्य.
किंमत 29,900 रु.


क्रांतिकारी झूम
नवीन क्रांतिकारी झूम रिंगमुळे इन-कॉल फोटो शेअरचे वैशिष्ट्य अ‍ॅक्टिव्हेट करता येईल; एमएमएसद्वारे थेट संबंधित प्रतिमा बोलत असलेल्या पाठवू शकतील.
गॅलक्सी एस 4 मिनीचे फीचर्स
० 4.27 इंच क्यूएचडी सुपर अ‍ॅमोलेड प्लस डिस्प्ले
० वजन : 108 ग्रॅम वजन
० 1.7 जीएचझेड ड्युअल कोअर प्रोसेसर
० 8 मेगापिक्सेल मागील तसेच 1.9 मेगापिक्सेल एचडी फ्रंट कॅमेरा
० साउंड अँड शॉटमुळे फोटो काढतेवेळीचा आवाजही एकत्रपणे रेकॉर्ड करता येतो.
० पॅनोरमा शॉटमुळे फोटोच्या आसपासच्या गोष्टीही पाहणे शक्य


किंमत 27,900 रु.