आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Garware Wall Ropes In Security System Production

पुण्यातील गरवारे वॉलरोप्स आता संरक्षण साहित्य निर्मितीमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - रोप्स व्यवसायात जगात आघाडीवर असलेल्या पुण्यातील गरवारे वॉलरोप्सने आता संरक्षण साहित्य निर्मितीत दमदार प्रवेश केला आहे. यामुळे स्वदेशी उत्पादने येथे तयार करण्याची मोठी संधी मिळाली इतकेच नाही तर ती आयात पर्यायी असल्याने परकी चलनाची कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे. कंपनीचा सातारा जिल्ह्यातील वाईतील प्रकल्प सर्वात अत्याधुनिक असून त्यामुळे परिसरातील महिलांसह पाच हजार जणांना रोजगार मिळाला आहे.

कंपनीच्या नव्या व्यवसायाची माहिती निवडक पत्रकारांना देताना मुख्य कार्यकारी अधिकारी शुजाउल रेहमान म्हणाले की गेल्या पाच वर्षात वाईच्या प्रकल्पात आम्ही 150 कोटी रुपये गुन्तवणूक केली. सध्या 72 देशात आमची उत्पादने निर्यात केली जातात. महिना 1400 टन उत्पादन केले जाते. यात पोलादापेक्षा दणकट रोप पासून मासेमारीकरता वापरल्या जात असलेल्या जाळ्यांचे उत्पादन होते. कच्च्या मालाचा भाव 30 टक्के वाढूनही आमची सरासरी वार्षिक वाढ 18 टक्के आहे. नुकताच आम्ही संरक्षण खात्याला लागणारी उत्पादने बनवण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे.त्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसोबत(डीआरडीओ) इन्फ्लेटेड रडार स्ट्रक्चर निर्मिती केली जाते आहे. याआधी आम्ही भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो ) उपग्रह वाहून नेण्यास वापरता येईल असे जाळे ( नेट ) पुरवले आहे.लष्करी टेहळणीस वापरली जाणारी एरोस्टार बलून सध्या इस्रायल आणि अमेरिकेतून आयात केली जातात ती आम्ही देशात बनवत आहोत यामुळे आपले महागडे परकी चलन वाचेल. चिली आणि पश्चिम आशिया बाजारपेठेत आम्ही लवकरच जाणार आहोत.

जागतिक फुटबॉल करंडक स्पर्धेला गोलपोस्ट जाळी , विम्बल्डन टेनिस कोर्ट वरील जाळे यासह किमान दहा खेळात वापरले जाणारे साहित्य कंपनी बनवतेक़्रिद साहित्य निर्यात करणारी आमची सर्वात मोठी कंपनी आहे,असे नमूद करून रेहमान म्हणाले की डेन्मार्क मधील अडीच हजार टन वजनाचा सील पकडण्यास खास प्रकारचे जाळे आम्ही पुरवतो आणि देशाच्या कृषी क्षेत्राला लागणारे साहित्य देणारी आमची सर्वात मोठी कंपनी आहे.

आबासाहेब गरवारे यांच्या द्रष्टेपणातून हा पसारा निर्माण झाला असे सांगून ते म्हणाले की जिओ सिंथेटिक,सागर उद्योग, कृषी यांची भविष्यात मोठी गरज निर्माण होणार असून त्यात व्यवसाय वाढीस वाव आहे. वाई भागातील महिलांना आणि तरुणांना प्रशिक्षण देऊन आम्ही स्वावलंबी बनवले इतकेच नाही तर उत्पादनातील काही सुटे भाग आम्ही त्यांच्याकडून करून घेत आहोत. पायाभूत सुविधा उद्योगाला लागणारी उत्पादने आम्ही बनवत आहोत. भविष्यात या क्षेत्राची देशाची वाढ आम्हाला साह्यकारी ठरेल.