आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gas Portability Starts Into 25 Cities, Change Company, Dealer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गॅस पोर्टेबिलिटी 25 शहरांत होणार सुरू; कंपनी, वितरकही बदला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मोबाइलसारखे एलपीजी जोडण्याची पोर्टेबिलिटी शक्य होईल. ही योजना देशातील 25 प्रमुख शहरांत लागू होत असून इच्छुक ग्राहक वितरकासह कंपनीही बदलू शकतील. यामुळे वितरणातील अनियमितता आणि होणारा विलंब यावर अंकुश राहील.

ही योजना चंदिगडमध्ये लागू असली तरी यात वितरक बदलता येतो, परंतु कंपनी बदलण्याची सुविधा नाही. आता दोन्ही सुविधा ग्राहकांना मिळतील. महाराष्ट्रात नागपूर आणि पुण्यात ही योजना लागू होत आहे.

समजा इंडेनची जोडणी बदलून एचपीची हवी असेल तर.
1. दोन्ही वितरकांकडे अर्ज करावा.
2.15-20 दिवसांत इंडेन कंपनी एचपीकडे माहिती पाठवेल.
3. एखाद्या वितरकाचे ग्राहक मोठय़ा प्रमाणात कमी होत असतील तर त्याचा परवाना रद्द होऊ शकतो.