आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०२० पर्यंत देशाचा आर्थिक विकासदर ७.५ % : डी अँड बी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील सुधारणांना गती देणे तसेच त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विद्यमान सरकारचे सुरू असलेले प्रयत्न लक्षात घेता २०२० पर्यंत देशाचा जीडीपी ४.५ ट्रिलियन डॉलरवर जाण्याचा अंदाज डन अँड ब्रॅडस्ट्रीटने व्यक्त केला आहे.

जागतिक व्यावसायिक माहितीनुसार आर्थिक वर्ष २०१५ ते आर्थिक वर्ष २०२० पर्यंत आर्थिक विकासदर ७.५ टक्क्यांवर जाण्याचा अदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जवळपास तीन दशकांनंतर केंद्रातील सरकार बहुमताने निवडून आल्यामुळे देशासाठी एक उत्साहाचा क्षण आला असल्याचे डी अँड बीचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ अर्जुन सिंग यांनी सांगितले. सध्याच्या मरगळीच्या वातावरणातून भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याची शक्यता असून आर्थिक वर्ष २०१५ च्या दुसऱ्या सहामाहीत ते िचत्र िदसेल.