आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gdp Slide Below 5 Percent : Centreal Institute Statistics

विकासदर 5 टक्क्यांपर्यंत खाली येणार :केंद्रीय सांख्यिकी संस्था

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कृषी, उत्पादन आणि सेवा क्षेत्राच्या खराब कामगिरीचा मोठा फटका देशाच्या आर्थिक विकासाला बसणार आहे. केंद्रीय सांख्यिकी संघटनेने यंदाच्या आर्थिक वर्षात विकासदर लक्षणीय 5 टक्क्यांपर्यंत खाली घसरण्याची भीती व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारने याअगोदर व्यक्त केलेल्या विकासदराच्या अंदाजालादेखील यामुळे तडा गेला आहे.
अगोदरच्या वर्षातल्या 6.2 टक्क्यांच्या तुलनेत सकल राष्‍ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी चालू आर्थिक वर्षात केवळ 5 टक्क्यांपर्यंतच मजल मारू शकते, असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी संघटनेने गुरुवारी अहवालात व्यक्त केला आहे.

आर्थिक विकासदराचा आलेख
2010 - 11 : 8.4 %
2009 - 10 : 8.4 %
2008 - 09 : 6.7 %
2006 - 07 : 9.6 %
2002-03 : 4 %

जीडीपी वाढीच्या अंदाजाचे आडाखे असे
सीएसओने व्यक्त केलेला 5 % आर्थिक वाढीचा आगाऊ अंदाज हा तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षाही खाली आहे.
रिझर्व्ह बॅँक ऑ फ इंडिया (सहामाही पतधोरण आढाव्यात) : 5.5 %
आंतरराष्‍ट्री य नाणेनिधी :5.4%; पुढील आर्थिक वर्षात 6 टक्क्यांपर्यंत झेप
केंद्र सरकार (सहामाही आर्थिक सर्वेक्षण) : 5.7 ते 5.9 %
मागील वर्षाच्या अर्थसंकल्पातील अंदाज : 7.6 %

विविध क्षेत्रांच्या वाढीचा असा असेल वेग
क्षेत्र 2011-12 2012-13
सेवा (वित्त, विमा आदी.) 11.7 % 8.6 %
खाणकाम -0.6 % + 0.4 %
बांधकाम 5.6 % 5.9 %
विद्युत, वायू, जल उत्पादन 6.5 % 4.9 %
व्यापार, हॉटेल, रेस्टॉरंट, संपर्क 7.00 % 5.2 %
सामाजिक आणि वैयक्तिक सेवा : 6 % 6.8 %