आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • General Electric Invest 3 Thousand Crores In Maharashtra

राज्यात ३ हजार कोटी गुंतवण्यास जीई राजी, दाओसमध्‍ये मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाओस/ मुंबई - इलेक्ट्रिक उपकरणांच्या उत्पादनात जागतिक पातळीवरील आघाडीच्या जनरल इलेक्ट्रिक (जीई) या उद्योगसमूहाने महाराष्ट्रात तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले. दाओसमधील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्र‌ी देवेंद्र फडणवीस यांनी विविध उद्योगसमूहाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्या वेळी जीईने ही घोषणा केली. जापनीज ट्रेड ऑर्गनाझेशनचे प्रमुख हिरोयुकी ईशिगे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जपानमधील कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. नगर जिल्ह्यातील सुपा येथे जापनीज इनव्हेस्टमेंट पार्क उभारण्याबाबत चर्चा झाली. येथे उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूकीबाबत जेट्रोला रस असल्याचे त्यांनी सांगितले. मित्सुई कंपनीचे केनीची होरी यांनी उत्पादन ते वित्तीय पुरवठा या क्षेत्रात रस दाखविला आहे.
कॉग्नीझेंटचा पुण्यात प्रकल्प : मुख्यमंत्र्यांनी कॉग्नीझेंटचे अध्यक्ष गोर्डन कोबर्न यांच्याशी चर्चा केली. कंपनीला हिंजेवाडीत प्रकल्पासाठी जमीन हवी आहे, सरकार या कंपनीला इरादापत्र देणार आहे. कॉग्नीझेंट राज्यात ५०० कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीची घोषणा लवकरच करणार आहे.

दाओस परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश

शिंडलर करणार प्रकल्प विस्तार
उद्‌वाहक, सरकते जिने (एस्कॅलेटर्स व इलेव्हेटर्स) निर्मितीत जागतिक पातळीवर अग्रेसर शिंडलर या उद्योग समूहाने दुस-या टप्प्यात तळेगाव येथे विस्तारित प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. या समूहाचे टिंगरेन यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
व्हिडीओकॉन, बजाजशी चर्चा
परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी नेस्ले, वायसी, शिंडलर, पेप्सिको, व्हिडिओकॉन, बजाज आदी उद्योग समूहांशी चर्चा केली. ‘नेस्ले’ चे नंदू नंदकिशोर‘पेप्सीको’च्या इंद्रा नुयी, व्हिडिओकॉनचे राजकुमार धूत, बजाजचे संजीव बजाज यांच्याशी चर्चा केली.
पुढे वाचा महाराष्‍ट्रात येणार ऑस्ट्रेलियाचे पथक