आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनरल मोटर्सची शेव्हर्ले सेडान कार सादर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जनरल मोटर्सने शेव्हर्ले सेल ही सेडान श्रेणीतील कार मुंबईत सादर केली. त्या वेळी कंपनीचे सीएफओ अनिल मेहरोत्रा, पश्चिम विभागाचे व्यवस्थापक युद्धवीर सिंह होते.

शेव्हर्ले सेलचे फीचर्स :
* मध्यभागी बसवलेली इंधन टाकी
* हाय रूफ डिझाइनमुळे उंच प्रवाशालादेखील डोक्याच्या बाजूला पुरेशी जागा
* 14 इंची मोठे टायर्स सेलला खड्डे तसेच उंंचवटे यांना तोंड देण्यास मदत करतात.

या रंगांत उपलब्ध : वेल्वेट रेड, स्विचब्लेड सिल्व्हर, समिट व्हाइट, कॅव्हियार ब्लॅक, लिनेन बेज, सॅनड्रिफ्ट ग्रे आणि मिस्टी लेक.

किंमत पेट्रोल : 4.99 लाख ते 6.41 लाख
डिझेल : 6.29 लाख ते 7.51 लाख रुपये (एक्स शो-रूम मुंबई)

ग्राहकांना मिळणार विशेष लाभ
तीन वर्षांची / 100,000 किलोमीटर (यापैकी जे प्रथम असेल ते ) सर्वसाधारण वॉरंटी, पाच वर्षे / 150,000 किलोमीटरकरिता इंजिन आणि ट्रान्समिशन वॉरंटी याशिवाय, ग्राहक शेव्हर्ले प्रॉमिस रिटेल पॅकेजचा पर्याय निवडू शकतात, ज्यात 3 वर्षांकरिता किंवा पहिल्या 45,000 कि.मी.नंतर मोफत देखभाल पॅकेज पुरवले जाते. सुट्या भागांची दुरुस्ती किंवा बदल, मोटारीची काळजीसंबंधित उत्पादने यावरील खर्च समाविष्ट नाही.