आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तवेरा कार रिकॉल, जनरल मोटर्सची घोषणा; धूर उत्सर्जन प्रणालीत दोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जनरल मोटर्स इंडिया कंपनीने 1.14 लाख मल्टिपर्पज शेव्हरले तवेरा गाड्या रिकॉल केल्या आहेत. तवेराच्या ऊर्जा उत्सर्जन प्रणालीत दोष आढळल्याने कंपनीने गाड्या माघारी बोलावल्या आहेत. 2005 ते 2013 या काळात तयार झालेल्या तवेरांचा यात समावेश आहे.

कंपनीने सरकारला दिलेल्या माहितीनुसार तवेरा बीएस 3 आणि तवेरा बीएस 4 या कारमध्ये प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमांनुसार काही त्रुटी आहेत. त्यामुळे कंपनीने या कार रिकॉल केल्या असून कंपनी त्यांची मोफत दुरुस्ती करून देणार आहे. जनरल मोटर्सच्या देशभरातील 280 वितरकांकडून ही दुरुस्ती होणार आहे. कंपनीने शेव्हरले तवेरा बीएस 3 ची निर्मिती 4 जूनपासून, तर तवेरा बीएस 4 या मॉडेलची निर्मिती दोन जुलैपासून थांबवली आहे. हा दोष सुरक्षेसंबंधी नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले. रिकॉलसाठी गाड्या केव्हा आणि कुठे आणायच्या हे कंपनी ग्राहकांना कळवणार आहे.


ग्राहकांसाठी काय पण
रिकॉलबाबत जनरल मोटर्स इंडियाचे अध्यक्ष व एमडी लॉवेल पॅडडॉक म्हणाले, आमचा ग्राहक हाच केंद्रबिंदू आहे, त्यांच्यासाठी कंपनी काहीही करण्यास तयार आहे. गाड्यांचे डिझाइन, बांधणी आणि विक्रीबाबत ग्राहकांच्या सूचनांचा आम्ही आदर करतो. दर्जा व गुणवत्ताविषयक बाबींसाठी मागील महिन्यातच कंपनीने तवेरा आणि सेलच्या हॅचबॅक आणि सेडान कारचे उत्पादन काही दिवस बंद ठेवले होते. सेलचे किती मॉडेल दोषयुक्त आहेत, याबाबत कंपनी सध्या तपास करत आहे.


वर्षभरात विविध 2 लाख मॉडेल रिकॉल
ऑटो क्षेत्रातील सिएम संघटनेने गेल्या वर्षी जुलैपासून संघटनेच्या सदस्य कंपनीला स्वयंस्फूर्तीने रिकॉलला मुभा दिली. त्यानंतर आतापर्यंत विविध कंपन्यांनी दोन लाख गाड्या रिकॉल केल्या आहेत. त्यात चारचाकी वाहनांची संख्या जास्त आहे. इंधनवाहक पंपात दोष आढळल्याने मारुतीने 2010 मध्ये एक लाख ए-स्टार कार रिकॉल केल्या होत्या. फोर्ड इंडियाने जूनमध्ये इकोस्पोर्ट एसयूव्ही रिकॉल केल्या होत्या. यामाहानेही हँडलबारमध्ये दोष आढळल्याने 56,082 रे मोटारसायकली माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.