आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनरल मोटर्सने चार हजार कार्स मागवले मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डिझेल इंजिनातील क्रँकशाफ्टमध्ये दोष आढळल्याने जनरल मोटर्सने 4000 सेल कार माघारी बोलावल्या आहेत. यासाठी कंपनीने 2,910 सेडान सेल कार आणि 1090 कॉम्पॅक्ट सेल कार रिकॉल केल्या आहेत. ग्राहक कंपनीच्या केंद्रस्थानी असून त्यांना येणार्‍या समस्यांचे निराकरण करण्यास कंपनी नेहमीच प्राधान्य देते, असे मत कंपनीचे भारतातील उपाध्यक्ष पी. बालेन्द्र यांनी व्यक्त केले.

त्यांनी सांगितले, सेल कारच्या 1.3 लिटर डिझेल इंजिनाच्या क्रँकशाफ्टमध्ये दोष आहे. त्यामुळे इंजिनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम जाणवत आहे. याच कारणामुळे शेव्हरले सेल कारचे उत्पादन तीन जूनपासून बंद ठेवण्यात आले आहे. या कारमधील दोष कंपनी दुरुस्त करून देणार असून ग्राहकांनी त्यांच्या कार केव्हा आणि कोठे आणायच्या याबाबत व्यक्तीश: कळवण्यात येणार आहे. कंपनीच्या देशभरातील 278 सेवा केंद्राद्वारे ही दुरुस्ती करण्यात येणार आहे.

जनरल मोटर्सने यापूर्वी जुलैमध्ये 1.14 लाख तवेरा ही मल्टीपर्पज व्हेइकल (एमपीव्ही) रिकॉल केली होती. ऊर्जा उत्सर्जन नियमांवरून तवेराचा रिकॉल करण्यात आला होता.