आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Audi ने लॉन्च केली लेझर आयबीम स्पोर्ट्स कार R8 LMX, किंमत 2.97 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/मुंबई- लक्झरी कार निर्माता कंपनी 'Audi' ने भारतात लेझर आयबीमने अद्ययावत असलेली स्पोर्ट्स कार 'R8 LMX' लॉन्च केली आहे. दिल्ली एक्सशोमध्ये या कारची किंमत सुमारे 2.97 कोटी रुपये आहे. लेझर आयबीम लायटिंग असलेली ही भारतातील पहिलीच अत्याधुनिक कार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लेझर लायटिंगमुळे रस्त्यावरील व्हिजिबिलिटी वाढते. त्यामुळे ही कार खूप सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कार अवघ्या 3.4 सेकंदात 100 किमीचा स्पीड घेते तर काही सेकंदात ताशी 320 किमी वेगाने ही कार धावते. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात Audi चे एक पाऊल पुढे असल्याचे Audi Indiaचे प्रमुख जो किंग यांनी लॉंचिंगच्या कार्यक्रमात सांगितले. लेझर हेडलाइड असलेली ही पहिली कार असल्याचा दावा जो किंग यांनी केला आहे.

एलईडी आणि लेझर आयबीम लायटिंग सगळ्यात आधी Audi R18run क्वॉटरोमध्ये वापरण्‍यात आली होती. लिमिटेड एडिशन Audi R8LMX भारतात तयार झालेली पहिली कार आहे. ही एक स्पोर्ट्‍स कार असून यात लेझर आयबीमसह अनेक अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, Audi R8LMX या स्टायलिश कारचे निवडक Photo....