आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • German Company Samson Started Their Volve Project At Ranjangaon

जर्मन कंपनी सामसनचा रांजणगावात व्‍हाल्‍व्‍ह निर्मितीचा प्रकल्‍प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अन्नधान्य, वायू, पेट्रो रसायने, दुग्ध व्यवसाय अशा अनेक क्षेत्रात उपयोगी ठरणारे व्हाल्व्ह बनविणारी जर्मनीची सामसन कंट्रोल्स कंपनी पुण्याजवळील रांजणगाव येथे आणखी एक प्रकल्‍प उभा करणार आहे. यासाठी ७१ कोटी रुपये गुंतवणार असल्‍याची माहिती व्यवस्थापकीय संचालक अतुल राजे यांनी दिली.

याशिवाय कंपनी मगरपट्टा येथे प्रकल्प संरचना कार्यालयही सुरु करणार आहे. दिल्ली, कोलकता बडोदा मुंबई हैदराबाद बंगलोर, चेन्नई येथे कंपनीची विक्री कार्यालये आहेत. वाढत्‍या भारतीय बाजारपेठेचा फायदा घेता यावा यासाठी कंपनी प्रकल्प विस्तार करत आहे. आतापर्यंत तीन वर्षांत कंपनीने १४२ कोटी रुपये गुंतविले आहेत.

नव्या प्रकल्पात सर्व यंत्रणा अत्याधुनिक असतील. भारताबाहेरील प्रकल्पांच्या तुलनेत येथील उत्पादन खर्च अधिक असला तरी भविष्यात वाढणारी बाजारपेठ लक्षात घेता चांगली संधी मिळेल, असा विश्‍वास कंपनीला आहे. सध्या वर्षाला दहा हजार व्हाल्व्ह निर्मितीची क्षमता असूनतीत गरजेनुसार वाढ केली जाणार आहे. श्रीलंका, बांगलादेश येथे कंपनी निर्यात करत असली तरी त्‍यांचा मुख्य भर हा देशातील बाजारपेठेवरच राहणार आहे. रिलायन्स, बायर, लार्सन-टुब्रो, सिमेन्स अशा बहुराष्ट्रीय कंपन्या ग्राहक आहेत.